Tuesday , August 18 2026
Breaking News

अत्याधुनिक नंबर प्लेट, हेल्मेट सक्तीबाबत निपाणी पोलिसांची धडक कारवाई; दिवसभरात ३९ जणावर कारवाईचा बडगा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : श्रावण सोमवारची संधी साधून शहरासह ग्रामीण भागातील नागरिक बाजार आणि इतर कामानिमित्त आले असताना अचानकच निपाणी शहर, बसवेश्वर पोलीस ठाण्यातर्फे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांनी अत्याधुनिक नंबर प्लेट, अल्पवयीन दुचाकीस्वार, विना हेल्मेट दुचाकी स्वारावर येथील साखरवाडी परिसरात दिवसभर कारवाईची मोहीम उघडली. यावेळी पोलिसांनी दंडात्मक कारवाई स्वीकारा अन्यथा हेल्मेट खरेदी करा, असा इशारा दिला. त्यामुळे दुचाकीस्वारांना पळता भुई थोडी झाली.
पोलीस प्रशासनातर्फे दुचाकीस्वारांना आधुनिक नंबर प्लेट, हेल्मेट सक्तीची करून त्याबाबत वेळोवेळी जनजागृती केली होती. पण त्याकडे दुचाकीस्वारांनी दुर्लक्ष केल्याने पोलिसाकडून कारवाई केली जात आहे. पोलिसांनी ३९ जणावर कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे हेल्मेट नसलेल्या दुचाकी जाग्यावरच जप्त केल्या.
——————————————————————–
२० हजार रुपये पर्यंत दंड
हेल्मेट न वापरणाऱ्या आणि नंबर प्लेट नसलेल्या वाहनधारकांना २ हजारापासून २० हजार रुपयाच्या दंडाच्या पावतीची कारवाई केली.
त्यामुळे बहुतांश दुचाकीस्वारांनी कायमस्वरूपी हेल्मेट विकत घेण्याचा निर्णय घेतला.
——————————————————————-
‘हेल्मेट आणि अधिकृत वाहनांचा क्रमांक नसताना अपघात झाल्याने अनेक दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. अशा घटनाबाबत जागृती करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. एकाच दिवशी २५ हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या पुढील काळातही निरंतरपणे ही कारवाई सुरू राहणार आहे.
शिवानंद कार्जोळ, उपनिरीक्षक शहर पोलीस ठाणे

About Belgaum Varta

Check Also

नागपंचमी यात्रेनिमित्त भाविकांची दर्शनासाठी निपाणी नागोबा मंदिरात दिवसभर गर्दी

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात सोमवारी (ता.१७) नागपंचमी सण साजरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *