Tuesday , August 18 2026
Breaking News

मन्नूर येथील मातोश्री सोसायटीतर्फे नवनिर्वाचित शाळा सुधारणा समितीचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : मन्नूर येथील मातोश्री सोहार्द सहकारी संघ (सोसायटी) यांच्या वतीने नवनिर्वाचित शाळा सुधारणा समितीच्या पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

मातोश्री सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आर. एम. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नवनिर्वाचित शाळा सुधारणा समितीच्या पदाधिकारी व सदस्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी तसेच शाळेतील भौतिक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नवनिर्वाचित समितीने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. शाळेच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने व समन्वयाने काम करण्याचे आवाहनही करण्यात आले.

नवनिर्वाचित शाळा सुधारणा समिती

समितीचे अध्यक्ष कल्लाप्पा तरळे, उपाध्यक्ष गंगा प्रताप सांबरेकर, तसेच सदस्य चाळोबा कोल्हापूरे, महादेव मीनाजी चौगले, महेश मा. पुजारी, लक्ष्मण ना. चौगुले, भाऊ चौगुले, स्नेहल होनगेकर आणि रेखा कदम यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास मातोश्री सोसायटीचे संचालक व सल्लागार तसेच शाळा सुधारणा समितीचे नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; ७५ वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला

Spread the love  महांतेश नगरमध्ये संतापजनक घटना; पाय व मांडीला सात-आठ वेळा चावा, मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *