निपाणी (वार्ता) : गडहिंग्लज येथील श्री. रवळनाथ कोऑप हौसिंग फायनान्स सोसायटी (मल्टी-स्टेट) संस्थेतर्फे हत्तरवाट (ता. चिक्कोडी) येथील संस्थेचे सदस किरण कमते हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ५३ व्या क्रमांकाने उतीर्ण झाले आहेत. त्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व संचालक एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सत्कार करण्यात आला. …
Read More »निवाऱ्याअभावी प्रवासी ऊन, पावसातच!
निपाणी मतदार संघातील अनेक गावात गैरसोय : विद्यार्थी, महिला, वृद्धांची अडचण निपाणी (वार्ता) : निपाणी मतदार संघातील सर्वच ग्रामीण भागात निपाणी आगारातर्फे बस सुविधा सुरू आहे. पण प्रवाशांना थांबण्यासाठी अनेक गावांमध्ये बस थांब्यावर निवारा शेडच नसल्याने ऊन पावसात प्रवासी, विद्यार्थी वृद्ध नागरिकांना बसची वाट बघत ऊन, पावसातच तासनतास थांबावे …
Read More »‘सर्वोत्तम श्राविका’ पुरस्कार मिळाल्याने मिनाक्षी पाटील यांचा विविध संघसंस्थातर्फे सत्कार
निपाणी (वार्ता) : सामाजिक, धार्मिक कार्य आणि सेवाभावी वृत्तीमुळे निपाणी मतदारसंघात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मीनाक्षी रावसाहेब पाटील यांना नवी दिल्ली येथील ‘भारत दिवस दिगंबर जैन महिला महासभेतर्फे ‘सर्वोत्तम श्राविका’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त त्यांचा निपाणी मतदारसंघातील विविध संघ संस्था, युवक मंडळ, सामाजिक संस्था आणि महिला …
Read More »निपाणीत भगवान महावीरांचा जय, जयकार
जन्मकल्याणक महोत्सवाला गर्दी ; विविध आकर्षक पालखी मिरवणूक निपाणी (वार्ता) : जगाला अहिंसा आणि शांतीचा संदेश घेणाऱ्या श्री १००८ भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव येथील दिगंबर जैन समाजातर्फे व्यंकटेश मंदिरात सोमवारी पार पडला. त्यानिमित्त दिवसभर श्रावक -श्राविकांनी महावीरांचा जयघोष केला. जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवानिमित्त रविवारी …
Read More »पंचमहाव्रतांचे पालनाने शांतता, सामाजिक सुव्यवस्था
सहकाररत्न उत्तम पाटील; बोरगावमध्ये महावीर जयंती निपाणी (वार्ता) : विश्वशांतीसाठी वाणीची हिंसा टाळून संयम, करुणा आणि अनेकांतवादाचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे.भौतिक सुखांच्या मागे धावणाऱ्या पिढीने परिग्रह, असत्य आणि मायाचार टाळून संयमाचा मार्ग स्वीकारावा. दिन-दुबळ्यांची सेवा, ज्ञानदान आणि रुग्णांन मदत करणे हाच खरा धर्म आहे.जीवनात अहिंसा, सत्य, अचौर्य ब्रह्मचर्य आणि …
Read More »मजुरांच्या टंचाईमुळे ‘हार्वेस्टर’लाच पसंती; गहू, हरभरा काढणीची लगबग
मजुरांना ३०० रुपये मजुरी देऊनही मनुष्यबळाची कमतरता निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण परिसरात सध्या हरभरा, गहू काढणीच्या कामांना वेग आला आहे. वाढता उन्हाचा तडाखा आणि मजुरांची तीव्र टंचाई यामुळे शेतकरी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक हार्वेस्टर यंत्राद्वारे काढणी करण्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वेळ आणि श्रमाची बचत …
Read More »सीमा भागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाबाबत उद्या घेणार महाराष्ट्र सरकारची भेट
निपाणी ( वार्ता) : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून आजपर्यंत सीमा भागात कन्नड मराठी भाषिक एकत्रितपणे राहत आहेत. तरीही कर्नाटक सरकार वेगवेगळ्या मार्गाने सीमा भागातील मराठी बांधवावर अन्याय करीत आहे. याशिवाय कन्नड सक्तीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मध्यस्थी करून सीमा भागातील मराठी बांधवांना न्याय देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील नेते मंडळींची …
Read More »चालकाच्या प्रसंगावधानाने ‘बर्निंग बस’चा थरार वाचला
सौंदलगा बस स्थानकावरील घटना : प्रवाशांनी मारल्या बसमधून उड्या निपाणी (वार्ता) : सध्या उन्हाळा सुरू असून या काळात वाहनांना शॉर्टसर्किट व इतर कारणांनी आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच निपाणी आगाराची निपाणी -कुन्नूर ही बस (क्रमांक के.ए.२३-३११) रविवारी (ता.२९) सायंकाळी पाच वाजता सुमारास सौंदलगा बस स्थानकावर आल्यानंतर इंजिन मधून …
Read More »निपाणकर सरकार राजवाड्यातील मानाची पालखी, सासनकाठी शिंगणापूरकडे रवाना
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर-सरकार यांच्या राजवाड्यातील मानाची सासनकाठी व पालखी श्री क्षेत्र त्र शिखर शिंगणापूर महादेव मंदिराकडे निपाणी येथून रवाना झाली. त्यानिमित्त श्रीमंत दादाराजे देसाई सरकार, मानकरी व मान्यवरांच्या हस्ते सासनकाठीची पूजा करण्यात आली. शिखर शिंगणापूर येथे चैत्र महिन्यानिमित्त निपाणका सरकार घराण्यातील मानाची पालखी …
Read More »‘सर्वोत्तम श्राविका’ पुरस्कार मिळाल्याने ‘अरिहंत’तर्फे मीनाक्षी पाटील यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील मीनाक्षी रावसाहेब पाटील यांचे धार्मिक कार्य आणि सेवाभावी वृत्तीमुळे त्यांना नवी दिल्ली येथील भारत वर्षीय दिगंबर जैन महिला महासभेतर्फे ‘सर्वोत्तम श्राविका’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत देशपातळीवर त्यांना मिळालेला हा सन्मान बोरगावसाठी गौरवाचा क्षण ठरला आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta