Friday , October 23 2026
Breaking News

निपाणीत थ्रीडी राख्यांचे आकर्षण

Spread the love

 

बाजारात विविधरंगी राख्या दाखल ; यंदा दरवाढ नाही

निपाणी (वार्ता) : आठवड्यापासून शहर आणि परिसरातील नागरिकांना राखी पौर्णिमेचे वेध निपाणी बाजारपेठेला लागले होते. गुरुवारी (ता.२७) हा सण साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणी बाजारपेठेत थ्रीडी राख्यासह अयोध्येतील श्रीराम मंदिर, जय श्रीराम लिहिलेल्या राख्या लक्ष वेधत असून अनेकविध प्रकारच्या विविधरंगी, आकर्षक राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत. आठवड्यापूर्वीच परगावी असलेल्या आपल्या भावांना पोस्टाने राख्या पाठवले आहेत.
राखी पौर्णिमे निमित्त बाजारात अनेक प्रकारच्या राख्या दाखल झाल्या आहेत. अयोध्येत झालेल्या श्रीराम मंदिर उभारणीचे प्रतिबिंब राख्यांवर उमटले आहे. अयोध्येतील मंदिरासह जय श्रीराम लिहिलेल्या राख्यासह थ्री डीसह पारंपरिक विविधरंगी आकर्षक राख्या, गोंड्यांच्या राख्याही बाजारात विक्रीस दाखल झाल्या आहेत. शहरातील अशोकनगर, कोठीवाले कॉर्नर, चाटे मार्केट, बेळगावनाका, जुना पी. बी. रोड या महत्त्वाच्या बाजारपेठांसह शहरातील विविध भागातील दुकानांतून राख्यांची विक्री सुरू झाली आहे. त्यासाठी छोटे-मोठे स्टॉलही उभारले. आहेत. कुंदन वर्क, ग्रीटिंगसह राखी, सिल्व्हर वर्कच्या राख्यांनाही मागणी आहे. यंदा बेस्ट भाई, ब्रो, वीरा या नव्या राख्या बाजारात आल्या आहेत. महागाई वाढली असली तरी राखीचे दर स्थिर असल्याचे राखी विक्रेत्यांनी सांगितले.
लहान मुलांच्या आवडीचे व त्यांच्यात प्रसिद्ध असलेले कार्टूनही राख्यांवर अवतरले आहेत. यात मोटू-पतलू, डोरेमॉन, छोटा भीम, पोकेमॉन असलेल्या राख्यांचा समावेश आहे. याशिवाय साहसी स्पायडरमॅनही लक्षवेधी ठरत आहे.
—-
‘शहरातील बाजारात १० ते २०० रुपयांपर्यंतच्या राख्या उपलब्ध आहेत. अनेक व्यवसायिकांनी गांधीनगर येथून राख्या आणल्या आहेत. यावर्षी थ्रीडीसह राम मंदिराच्या प्रतिकृतीसह विविध प्रकारच्या वेगवेगळ्या आकारातील, डिझाईनमधील, रंगांच्या आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध आहेत. आता शहरात राखी विक्रीसाठी छोटे-मोठे स्टॉल लागत असल्याने दुकानांतून विक्रीचे प्रमाण कमी झाले आहे.
-प्रमोद व्हनशेट्टी, राखी विक्रेते, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

हनुमान को-ऑप. सोसायटीचा कुर्लीमध्ये उद्घाटन सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : कुर्ली येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या श्री हनुमान को-ऑप.सोसायटीचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *