Wednesday , August 26 2026
Breaking News

ऑक्टोबरपासून फ्लायओव्हरच्या कामाला मुहूर्त; वाहतूक कोंडीला मिळणार ‘ब्रेक’!

Spread the love

 

निविदा प्रक्रिया पूर्ण; काम सुरू करण्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी – प्रमुख मार्गांवरील कोंडी सुटण्याची अपेक्षा

बेळगाव : बेळगाव शहराला भेडसावणाऱ्या दिवसेंदिवस वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी प्रस्तावित फ्लायओव्हरच्या कामाला अखेर ऑक्टोबर महिन्यात सुरुवात होणार आहे. महत्त्वाकांक्षी फ्लायओव्हर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, प्रत्यक्ष कामाचा श्रीगणेशा करण्यासाठी आवश्यक पूर्वतयारीला वेग आला आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ही माहिती दिली.

शहरातील प्रमुख मार्गांवर वाढणारी वाहनांची संख्या आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता फ्लायओव्हर प्रकल्पाकडे दीर्घकालीन वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाची उपाययोजना म्हणून पाहिले जात आहे. प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, यासाठी पर्यायी मार्ग, वाहतूक वळविणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणाची स्वतंत्र व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

कामाचा वेग आणि दर्जा यावर विशेष भर

फ्लायओव्हरचे काम नियोजनबद्ध पद्धतीने आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक पावले उचलली जात आहेत. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर देखरेख ठेवून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची दक्षता घेतली जाणार आहे.

फ्लायओव्हर कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे. वाहनांची कोंडी कमी झाल्याने प्रवासाचा वेळ वाचणार असून, वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाया जाणाऱ्या इंधनाचीही बचत होणार आहे. त्यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेला गती देतानाच नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा ताणही कमी होण्याची अपेक्षा आहे.

विकासासोबत पर्यावरणाचीही काळजी

शहराच्या विकासाला गती देताना पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही, यालाही प्रशासनाकडून प्राधान्य दिले जाणार आहे. फ्लायओव्हरसह संबंधित विकासकामांची अंमलबजावणी करताना पर्यावरणपूरक उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे.

ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर शहराच्या वाहतूक व्यवस्थेतील हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, फ्लायओव्हर पूर्ण झाल्यानंतर बेळगावच्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर कितपत प्रभावी तोडगा निघतो, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

डूडलीफाय घेऊन आले मुलांच्या कल्पकतेला रंग देणारी आनंदाची पर्वणी

Spread the love  मुलांच्या कृतीशीलतेला वाव मिळावा, त्यांच्या कल्पनाशक्तीला नवी दिशा मिळावी आणि त्यांच्या कल्पना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *