Wednesday , August 26 2026
Breaking News

स्तवनिधी डोंगराच्या पायथ्याशी म्हसोबा हटणीच्या युवकाचा दगडाने ठेचून खून

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील स्तवनिधी डोंगराच्या पायथ्याशी युवकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता.२६) सकाळी उघडकीस आली. या घटनेने निपाणी परिसरात खळबळ उडाली आहे. महमंद समशेर खलिफ (वय ५२, रा. म्हसोबा हिटणी) असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळासह पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, स्तवनिधी डोंगराच्या पायथ्याशी काही नागरिकांना सकाळी एका पुरुषाचा मृतदेह पडलेला दिसून आला. नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार निपाणी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
मृतदेहाची तपासणी केली असता, चेहऱ्यावर दगडाने मारल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी महात्मा गांधी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.
मृत महमंद खलिफ हे आप्पासाहेब नलवडे साखर कारखान्यात नोकरीस होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.
या प्रकरणी मृत मोहम्मद यांच्या पत्नी नसिमा यांनी निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. खुनामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस पुढील तपास करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

नगरपालिका प्रशासनाचे पीओपीबाबत वराती मागून घोडे

Spread the love  ७० टक्के मूर्ती तयार ; नगरपालिका अलर्ट मोडवर निपाणी (वार्ता) : गणेशोत्सव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *