


सहकाररत्न उत्तम पाटील ; यमगर्णी आंदोलनस्थळी दिली भेट
निपाणी (वार्ता) : यमगर्णी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक नागरिकांच्या गरजा व अडचणी सोडवण्यासाठी गायरान जमिनी वापरणे योग्य आहे. यमगर्णी या जमिनीवर प्रस्तावित सांडपाणी धनकचरा प्रकल्पाबाबत ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी. या प्रश्नावर ग्रामस्थांच्या पाठीशी असून या प्रश्न मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना भेटून तोडगा काढणार असल्याची असल्याची ग्वाही सहकाररत्न उत्तम पाटील यांनी दिली.
यमगर्णी येथील गायरान जमिनीवर निपाणी नगरपालिकेचा घनकचरा प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाला ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित आंदोलनाला पाठिंबा देऊन पाटील बोलत होते.
ते म्हणाले, कोणत्याही सरकारी कामात अडथळा आणायचा नाही. मात्र, स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता आणि ग्रामसभेची भूमिका विचारात न घेता असे प्रस्ताव पुढे नेणे योग्य नाही. ग्रामस्थांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या वरिष्ठ अधिका-यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची बेंगळुरू येथे भेट घेऊन निवेदने देण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी प्रा. आर. के. दिवाकर, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष नासिरखान इनामदार, नितीन नेपीरे, अण्णासाहेब कोरे, प्रा. विजय कुंभार, शरद पाटील, संतोष पाटील सिद्धू मोरे, शैलेश पाटील युवराज मोरे, सुरेश कुंभार, बाळासाहेब पवार, काकासाहेब कांबळे
यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta