Monday , May 25 2026
Breaking News

निपाणी

छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिदिनी पांगिरे येथे चंदन बियाण्यांचे मोफत वितरण

  निपाणी (वार्ता) : लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी (ता.६ ) सकाळी १० वाजता पांगिरे येथे प्रतिमापूजन करून चंदन बियाण्यांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. येथील सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान व वीरभद्र ऑरगॅनिक अँड सँडलवुड ऍग्रीकल्चर सोसायटीतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचा निपाणी परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन …

Read More »

असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्सतर्फे १५० बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स आणि महात्मा गांधी रुग्णालय यांच्या संयुक्त सहकार्याने कामगार दिनानिमित्त बांधकाम क्षेत्रातील कामगार व कंत्राटदारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. व्हनशेट्टी पार्कमधील बी. आर. पाटील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात १५० कामगार, कंत्राटदारांची तपासणी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन झाले. …

Read More »

मुस्लिम समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील

  सहकाररत्न उत्तम पाटील ; मुस्लिम समाजातर्फे सत्कार समारंभ निपाणी (वार्ता) : सध्या समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून राजकारण सुरू आहे. त्यामुळे समाजासह गावांचा विकास खुंटला आहे. अशा गोष्टींना फाटा देऊन सर्व समाजाच्या विकासासाठी सर्वांना एकत्रित घेऊन शहराचा विकास सुरू आहे. या पुढील काळातही नागरिकांनी सहकार्य करून गावचा विकास साधावा, …

Read More »

उन्हाच्या तडाख्यामुळे दूध उत्पादनात घट

  चारा टंचाईसह पशुखाद्य दरवाढीचा फटका निपाणी (वार्ता) : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे दुधाळ जनावरांना मोठा फटका बसत असून दुग्ध उत्पादनातही लक्षणीय घट होत असल्याचे चित्र निपाणी परिसरात दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जनावरे चारा कमी खात असल्याने तसेच उष्णतेमुळे त्यांच्या अंगाची लाही लाही होत असल्याने दुधावर थेट परिणाम होत आहे. …

Read More »

खगोलशास्त्रीय घटनेमुळे सावली होणार गायब

  ५ मे रोजी निपाणी परिसरात शून्य सावली दिवस ; एस. एस. चौगुले यांची माहिती निपाणी (वार्ता) : पृथ्वीवर अनेक खगोलीय घटना सतत घडतात. हवामानातील बदलांमुळे कांही पाहता येतात तर कांही पाहता येत नाहीत. अशा घटनापैकी या महिन्यांत शून्य सावलीचे दिवस हा मजेशीर अनुभव घेता येणार आहे. खगोलशास्त्रीय भाषेत त्याला …

Read More »

निपाणी शिक्षक संघ निवडणूकीत चुरशीने मतदान होऊन गुरुसेवा पॅनेलचा विजय

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य सरकारी प्राथमिक शाळा शिक्षक संघ निपाणी तालुका संघटनेची पंचवार्षिक निवडणूक शुक्रवारी (ता.१) चुरशीने पार पडली. गुरुसेवा पॅनेलने ४ बिनविरोध महिला उमेदवारांसह सर्व ८ जागांवर विजय मिळवला तर विरोधी शिक्षक सेवा पॅनेल पराभुत झाले. यामध्ये दिवसभरात ५६३ पैकी ५०८ शिक्षकांनी मतदान केले. ९०% मतदान झाले. …

Read More »

वाढत्या उन्हामुळे टोमॅटो पिकाला फटका

  दरही नसल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत निपाणी (वार्ता) : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या अपेक्षेने टोमॅटोची लागवड केली असली, तरी वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे या पिकाला मोठा फटका बसत असल्याचे चित्र समोर येत आहे. सुरुवातीला चांगल्या उत्पन्नाची आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांना आता उत्पादन घटल्याने आर्थिक गणित कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. शिवाय …

Read More »

बोरगांववाडी सिद्धिविनायक गणेश मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना समारंभ

  निपाणी‌ (वार्ता) : बोरगाववाडी येथील सिद्धिविनायक गणेश मंदिराचा वास्तुशांती सोहळा व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम निडसोशी येथील दूरदुंडेश्वरमठाचे पंचम शिवलिंगेश्वर स्वामी यांच्या दिव्य सानिध्यात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून सहकारत्न उत्तम पाटील यांची उपस्थिती होती. व्यासपीठावरील मान्यवर आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पडले. उत्तम पाटील यांनी, देव हा सर्वत्र …

Read More »

बस स्थानकात पडलेले खड्डे बुजवल्याने चालक, वाहकासह प्रवाशातून समाधान

  निपाणी (वार्ता) : तालुक्याचे ठिकाण असलेल्या निपाणी येथील बसस्थानक आवारातील विविध फलाटांवर पडलेले खड्डे अखेर आगार प्रशासनाने बुजवले आहेत. अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या समस्येमुळे बस चालकांसह प्रवासी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. बसस्थानक परिसरात अस्वच्छतेचेही साम्राज्य पसरले होते. पंचहमी कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आगाराने याची दखल …

Read More »

उन्हामुळे शहरातील मैदाने पडली ओस घरातील बैठ्या खेळांकडे मुलांचा कल

  निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यात सध्या उन्हाचा पारा ४१ अंशांच्या पार गेल्याने शहर व ग्रामीण भाग अक्षरशः होरपळून निघत आहे. या तीव्र उष्णतेचा फटका विद्यार्थ्यांना आणि सुट्यांचा आनंद घेणाऱ्या तरुणाईला बसला आहे. शहरासह ग्रामीण भागातील खेळांची मैदाने वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळी ओस पडत असून घरीच बैठ्या खेळांकडे चिमुकल्यांचा कल …

Read More »