Monday , October 5 2026
Breaking News

आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत अक्कोळची श्रावणी रांगोळे ठरली अव्वल

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : श्री बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित अक्कोळ येथील श्री पार्श्वमती विद्यालयातील नववीतील विद्यार्थी श्रावणी जंबूकुमार रांगोळे हिने आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला. कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूलतर्फे शनिवारी (ता.३) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
श्रावणी जंबूकुमार रांगोळे हिने मोठ्या गटातून सहभागी होत प्रभावी वक्तृत्वाने उपस्थितांची मने जिंकून प्रथम क्रमांक मिळविला. तिला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी, रोख ४ हजार रुपयेचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. या यशाबद्दल पी. बी. आश्रमाचे उपाध्यक्ष राजू पाटील, शाळेच्या उपाध्यक्षा अनिता पाटील, कार्यकारी संचालक महावीर पाटील, दादासाहेब मगदूम, सुंदर पाटील, अशोक व्होनशेट्टी, सन्मती रांगोळे, मुख्याध्यापक डॉ. राकेश तावदारे यांच्या हस्ते रांगोळे हिचा सत्कार करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

अक्कोळ भैरवनाथ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावरआयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत अक्कोळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *