


निपाणी (वार्ता) : हारुगेरी येथील श्री. एस. एस. जांबगी मेमोरियल एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या श्री. सिद्धिविनायक ग्रामीण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि संशोधन केंद्राचा दीक्षांत समारंभ पार पडला. त्यामध्ये बेनाडी येथील डॉ. अर्चना पुंडलिक ढवणे यांना आयुर्वेदिक औषध आणि शस्त्रक्रिया (बीएएमएस) ची पदवी बहाल करण्यात आली आहे.
अर्चना हिचे दहावीपर्यंतचे शिक्षण बेनाडी येथील श्री काडसिद्धेश्वर हायस्कूलमध्ये झाले. तिला दहावी परीक्षेत ९४ टक्के गुण मिळाले होते. बारावी मध्ये ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने तिला सरकारी कोट्यातून प्रवेश मिळाला होता. हारुगेरी येथे चार वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून तिने पदवीसाठी घरातूनच अभ्यास पूर्ण केला होता. धनगर समाजातील अर्चनाने कठीण परिस्थिती आणि सातत्यपूर्ण अभ्यास करून ही पदवी प्राप्त केली आहे. त्यामुळे तिचे कौतुक होत आहे. तिला प्राचार्य डॉ. बसवराज गंटी, व्यवस्थापकीय संचालक डॉ. लक्ष्मण जंबगी, डॉ. व्हर्षल जंबगी यांचे मार्गदर्शन तर सुरज आरगे, पुंडलिक ढवणे यांचे प्रोत्साहन लाभले.

Belgaum Varta Belgaum Varta