Monday , October 5 2026
Breaking News

निपाणीतील मटण, मच्छी मार्केट दुर्गंधीच्या विळख्यात

Spread the love

 

पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांसह व्यापारीही त्रस्त

निपाणी (वार्ता) : नागरिकांना ताजे मासे व मटण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने शहरातील भाजी मंडई जवळ पालिकेने मासे आणि व मटण मार्केटला जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र बऱ्याच वर्षापासून या जुनाट प्रतीक्षेत असलेल्या मार्केटकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे व्यापारी, ग्राहक समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत. कचरा, सांडपाणी, अस्वच्छताव दुर्गंधीमुळे तेथे येणे-जाणेही ग्राहकांसाठी त्रासदायक ठरत असून, रोगराईलाच निमंत्रण मिळत आहे.
मटन आणि माशांची साफसफाई केल्यानंतर निघणारा कचरा आणि दूषित पाणी वाहून नेण्यासाठी मार्केटमध्ये सक्षम गटार व्यवस्था नाही. त्यामुळे सांडपाणी जागोजागी साचते. त्यातच माशांचा कचरा वेळेत उचलला जात नसल्याने दुर्गंधी पसरली आहे.
या मार्केटच्या नूतनीकरणाची मागणी व्यापाऱ्यांकडून अनेक वर्षांपासून केली जात असूनही दुर्लक्ष होत आहे. काही वर्षापूर्वी नूतनीकरणासाठी निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. मात्र याबाबत कोणतीच हालचाल झालेली नाही.
——————————————————————–
अशी आहे स्थिती

* स्वच्छतेअभावी दुर्गंधीचा त्रास

* सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारीचा अभाव

* मटण-माशांच्या कचऱ्याचा प्रश्न कायम

* निधी मंजुर होऊनही काम नाही

* मटण-मासे विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम

* पालिकेच्या कर उत्पन्नालाही फटका

About Belgaum Varta

Check Also

अक्कोळ भैरवनाथ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावरआयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत अक्कोळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *