निपाणी (वार्ता) : बोरगावसह परिसरात गुरुवारी (ता.२३) वादळी वाऱ्याने थैमान घातले. त्यामुळे अनेक घरांच्या भिंतीना तडे जाण्यासह छप्पर उडून गेली आहेत. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय माणकापूर येथे वादळी वाऱ्यामुळे प्राथमिक शाळेचेही नुकसान झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत सहकाररत्न उत्तम पाटील यांनी शुक्रवारी (ता.२४) …
Read More »चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात निपाणीचा झेंडा; निपाणी तालुक्याचा ९५.८८ टक्के निकाल
निपाणी (वार्ता) : दहावी बोर्डाचा निकाल गुरुवारी (ता.२३) जाहीर झाला आहे. त्यामध्ये निपाणी तालुक्याने चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविला आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यामध्ये केएलई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनी नम्रता भारत माने व श्रावणी परशुराम पाटील या दोघींनी ९९.२% गुण मिळवत तालुक्यात पहिला …
Read More »लेटेक्स कॉलनीतील जलकुंभावर उगवले गवत; नगरपालिका प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि उपनगरात पाणीपुरवठ्यासाठी विविध ठिकाणी जलकुंभांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पण लेटेक्स कॉलनी जवळील बदलमुख रोडवरील सीबीएससी स्कूलसमोरील जलकुंभाची दुरावस्था होत आहे. सध्या या जलकुंभाच्या परिसरात झाडाझुडपांचे साम्राज्य निर्माण झाले असून जलकुंभावर चक्क गवत उगवले आहे. पण त्याच्या स्वच्छतेकडे …
Read More »वाढत्या उन्हामुळे मंदावली गुरुवारी आठवडी बाजारातील ग्राहकांची वर्दळ
निपाणी (वार्ता) : आठवड्याभरापासून उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. त्यामुळे येथे गुरुवारी भरत असलेल्या आठवडी बाजारावर वाढत्या उन्हाचा परिणाम जाणवला. सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवत असल्याने बाजारातील नेहमीची गर्दी यावेळी दिसली नाही. निपाणी परिसरात सुमारे ३० ते ४० खेडी आहेत. येथील बहुतांशी ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांचा व्यवहार या बाजारावर …
Read More »लिंगनूरच्या हरण्या- राजाने मारले ममदापूरचे मैदान
१.११ लाखाचे मिळविले बक्षीस : शिरूरची बैलगाडी ठरली द्वितीय निपाणी (वार्ता) : श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर -सरकार यांनी स्थापन केलेल्या प्रति तुळजापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ममदापूर ( के. एल.) येथील अंबिका देवीची यात्रेनिमित्त गुरुवारी (ता. २४) विविध शर्यती पार पडल्या. त्यामध्ये ‘अ’ गट जनरल बैलगाडी शर्यती मध्ये लिंगनूर (ता. कागल) …
Read More »लग्न समारंभ, वास्तुशांतीमुळे फुलांच्या दरात तेजी
मोगरा १००० रुपये किलो : गजऱ्याचे दरही दुप्पट निपाणी (वार्ता) : अक्षय तृतीयेपासून विवाह सोहळ्यांना प्रारंभ झाला आहे. पुढील काही दिवस आणखीन मुहूर्त असल्यामुळे सर्वच प्रकारच्या फुलांच्या दरांत वाढ झाली आहे. लग्न समारंभात महिलांची विशेष पसंती असलेल्या गजऱ्यासाठी लागणाऱ्या एक किलो मोगऱ्याचा दर १००० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. याशिवाय …
Read More »गॅस दरवाढीने चुलीवरच्या जेवणाला ‘अच्छे दिन’
सर्वत्र सिलिंडरचा तुटवडा; ‘त्या’ हॉटेलकडे वळले खवय्ये निपाणी (वार्ता) : इराण-इस्त्राईल युध्दजन्य परिस्थिती सुरू आहे आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर आर-पारची लढाई सुरू केली आहे. या युध्दाची झळ सगळ्यांनाच बसू लागली आहे. ही झळ स्वयंपाक घरापर्यंत आली आहे. शहरासह ग्रामीण भागात सिलिंडरची टंचाई झाली आहे. खेड्या पाड्यात …
Read More »भर उन्हातील जनगणनेमुळे शिक्षक अडचणीत
उन्हाळी सुट्टीवर गदा ; मधुमेह, रक्तदाबाच्या शिक्षकांनाही ड्युटी निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांच्या परीक्षांपासून निकालांपर्यंत शिक्षकांना विविध कामे करावी लागतात. एप्रिल महिन्यात कामांचे प्रमाण वाढते. शिक्षण विभागाकडूनया कामांचा ताण वाढत असून त्यातच विविध प्रशासकीय कामांची भर पडत आहे. एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या या दबावामुळे शिक्षकांवर मानसिक ताण निर्माण झाला …
Read More »वाळकी यात्रेत दानोळीच्या बंडा शिंदे यांची बैलगाडी प्रथम
बंडा खिलारे ठरले द्वितीय मानकरी; भर उन्हात शर्यती शौकिनांची गर्दी निपाणी (वार्ता) : वाळकी येथील श्री मरगुबाई देवाची यात्रा मंगळवार (ता.२१) आणि बुधवारी (ता.२२) पार पडली. त्यानिमित्त प्रथमच शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये दानोळीच्या बंडा शिंदे यांच्या गाडीने प्रथम क्रमांक मिळवून प्रथम क्रमांकाचे ३५ हजार ५५५ …
Read More »एलपीजी गॅस दरवाढीने रिक्षाची चाके थबकली
रिक्षा व्यवसायिक अडचणीत; दरवाढ मागे घेण्याची मागणी निपाणी (वार्ता) : घरगुती वापराच्या सिलिंडर पाठोपाठ रिक्षांसाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसच्या किमतीतही वाढ झाली आहे. ५५ रुपये प्रतिकिलो मिळणारा गॅस थेट १२० रुपयांवर पोहोचल्याने रिक्षा चालकांचे कंबरडे मोडले आहे. ही दरवाढ अशीच सुरू राहिल्यास रिक्षाचालकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनण्याची भीती शहरातील रिक्षा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta