Sunday , October 4 2026
Breaking News

निपाणी तहसीलदार सुरेश मुंजे यांच्या निवासस्थानी लोकायुक्तांची धडक कारवाई

Spread the love

 

निपाणी परिसरात खळबळ ; कागदपत्रांची झाडासारखी सुरू

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील तहसीलदार सुरेश मुंजे यांच्या रामनगर येथील भाड्याच्या घरावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.९) पहाटे सहा वाजता अचानक छापा टाकला.
त्यामुळे निपाणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या छाताबाबत अनेक तर्क वितर्क लढविण्यात येत आहेत. तालुक्याचे तहसीलदार सुरेश मुंजे यांच्या निवासस्थानावर पहिल्यांदाच लोकांनी छापा टाकला आहे. शिवाय त्यांच्यासह विविध कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, लोकायुक्तांचे पथक सकाळी अचानक तहसीलदार सुरेश मुंजे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर पथकाने घरातील विविध कागदपत्रे, साहित्य तसेच इतर संबंधित बाबींची तपासणी सुरू केली. या कारवाईदरम्यान पथकाकडून आवश्यक ती माहिती आणि कागदपत्रे तपासली जात असल्याचे समजते.
दरम्यान, ही कारवाई नेमक्या कोणत्या तक्रारीच्या किंवा प्रकरणाच्या अनुषंगाने करण्यात आली आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच झडती दरम्यान कोणती कागदपत्रे अथवा वस्तू आढळल्या, याबाबतही लोकायुक्त विभागाकडून अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
कारवाई सुरू असल्याचे वृत्त परिसरात पसरताच नागरिकांमध्ये आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. मात्र, झडतीदरम्यान काही मोठे आढळल्याच्या चर्चांना सध्या अधिकृत दुजोरा मिळालेला नसल्याने कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे घाईचे ठरणार आहे.
लोकायुक्त पथकाची झडती आणि तपासणी पूर्ण झाल्यानंतरच या कारवाईमागील नेमके कारण, तक्रारीचे स्वरूप तसेच तपासात काय निष्पन्न झाले, याबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
तहसीलदारांच्या निवासस्थानी झालेल्या या अचानक कारवाईमुळे महसूल विभागातील प्रशासकीय वर्तुळाचेही लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. लोकायुक्तांच्या तपासणीतून पुढे कोणती माहिती समोर येते आणि या कारवाईबाबत अधिकृतपणे कोणती माहिती दिली जाते, याकडे निपाणीकरांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, लोकायुक्त विभागाकडून अधिकृत माहिती किंवा कारवाईचा तपशील समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

ऑक्टोबरमध्ये सण-उत्सवांची पर्वणी

Spread the love  सर्वपित्री अमावास्येपासून नवरात्र, दसरा, कोजागरी, करवा चौथ निपाणी (वार्ता) : ऑक्टोबर महिन्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *