


गॅरंटी योजना समिती अध्यक्ष रमेश जाधव ; पंचमी गॅरंटी योजना कमिटीची बैठक
निपाणी (वार्ता) : महिलांच्या सबलीकरणासाठी राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ राज्याती कुटुंबीयांना होत आहे. पण योग्य लाभार्थींना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शासनाने अनेक अटी व निर्बंध घातले आहेत. त्याचे पालन केल्यास या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे सर्वेसाठी घरी येणाऱ्या अंगणवाडी कार्यकर्त्या व अधिकाऱ्यांना योग्य माहिती पुरविण्याचे आवाहन पंचहमी गॅरंटी योजना कमिटीचे तालुका अध्यक्ष रमेश जाधव यांनी केले. येथील तालुका पंचायत कार्यालयात मंगळवारी (ता.२९) आयोजित बैठकीत ते बोलत होते.
रमेश जाधव म्हणाले, बऱ्याच ठिकाणी महिला लाभार्थी असून त्यांच्याकडे मोबाईल नसल्याने कुटुंबातील सदस्यांच्या मोबाईलवर गृहलक्ष्मीची रक्कम जमा होत आहे. त्याचा गैरफायदा कुटुंबातील सदस्य घेत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी आता महिला लाभार्थ्यांच्या नावे मोबाईल आणि सिम कार्ड असणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा लाभार्थींची रक्कम बंद होणार आहे. त्यासाठी प्रत्येक महिलांनी अंगणवाडी शिक्षिकाजवळ जाऊन योग्य माहिती देऊन स्वतःचा सिम कार्ड वापरणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कुटुंबातील लाभार्थी व्यक्तींचा मृत्यू झाल्यास तात्काळ अंगणवाडी कार्यकर्त्याकडे त्याची नोंद करावी. लाभार्थी महिलेच्या निधनानंतर कुटुंबातील मुख्य महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. त्यासाठी आधार क्रमांक सीम मोबाईल क्रमांक संलग्नित करणे आवश्यक आहे. रक्कम जमा झाल्यानंतर ओटीपी येणार असल्याने लाभार्थ्यांनी आपल्याजवळ बँक पासबुक, आधार कार्ड क्रमांक जवळ ठेवावा. घराजवळच जीपीसी करून फोटो अपलोड झाल्यानंतर दुसऱ्या लाभार्थ्यांनी अर्ज केल्यास रक्कम मिळू शकत असल्याचे महिला आणि बाल कल्याण अधिकारी निर्मला कुरबेट्टी यांनी सांगितले. तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी यशवंत यांनीही योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली
याशिवाय अन्नभाग्य, शक्ती योजना, गृहलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी, युवा वेतन याशिवाय योजना वर चर्चा करण्यात आली. बैठकीस गॅरंटी योजना कमिटीचे उपाध्यक्ष अमोल बन्ने , प्रतीक शहा, अन्न व नागरी पुरवठा अधिकारी अभिजीत गायकवाड, प्रकाश पाटील, अशोक लाखे, यासीन मनेर, तात्या पाटील, सचिन खोत, अशोक लाखे यांच्यासह गॅरंटी योजना कमिटीचे पदाधिकारी, संचालक आणि विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta