निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट जनावरांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे होणारी जीवित व वित्तहानी थांबवण्यासाठी श्रीराम सेना (कर्नाटक) व त्रस्त निपाणीकातर्फे शुक्रवारी (ता.१७) नगरपालिकेवर मोर्चा काढून नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांना निवेदन देण्यात आले. आठवड्याभरात मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्यास ही जनावरे नगरपालिकेत …
Read More »गावोगावी फुलताहेत भक्तीची मळे
ऐन उन्हात आदमापूर, आडी दत्त देवस्थानकडे भक्तांची पाऊले निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगात प्रत्येकजण कामाच्या मागे धावत आहे. त्यामुळे मनशांती मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ मन शांतीसाठी गावोगावातील विविध धार्मिक मंडळे आदमापूर, मेतके येथील सद्गुरु बाळूमामा, श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी आणि आडी येथील दत्त देवस्थानला भेट देण्यासाठी पायी दिंडी …
Read More »ममदापूर (के. एल.) अंबिकादेवी यात्रेनिमित्त पाच दिवस विविध कार्यक्रमासह शर्यतींचे आयोजन
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांनी स्थापन केलेल्या प्रति तुळजापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ममदापूर ( के. एल.) येथील अंबिका देवीची यात्रा रविवार (ता.१९) ते गुरुवार (ता.२३) अखेर होणार आहे. निमित्त पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमासह शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजन कमिटीने दिली आहे. रविवारी …
Read More »घरगुतीतून व्यावसायिक सिलिंडरमध्ये रूपांतर
शहरात गॅस माफियांचा सुळसुळाट; अपघाताच्या धोक्याची शक्यता निपाणी (वार्ता) : आखाती देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यापासून घरगुती सिलिंडर मिळविण्यासाठी ग्राहकांचा आटापिटा सुरू आहे. त्यासाठी ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येणे आवश्यक असते. तरीही शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार करून त्यांचे व्यावसायिक सिलिंडरमध्ये रूपांतर केले जात असल्याचे समोर येत आहे. ठिकठिकाणी …
Read More »निपाणीसह परिसरात शिव-बसव जयंती, अक्षय तृतीयेच्या तयारीची लगबग
निपाणी (वार्ता) : शिव-बसव जयंती आणि अक्षय तृतीयेला केवळ दोन दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. शिव- बसव जयंतीसह अक्षय तृतीया सणाच्या तयारीची शहरासह ग्रामीण भागात लगबग दिसून येत आहे. येथील बाजारपेठेत जयंतीसाठी लागणारे नानाविध आकाराचे भगवे ध्वज आणि त्यावर शिव -बसव प्रतिमा असणारे ध्वज विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. विविध …
Read More »निपाणीत उन्हाचा कहर, पारा ४० अंशावर
निपाणीकर घामाघुम; चार दिवसापासून उष्णतेची लाट कायम निपाणी (वार्ता) : निपाणी शहर व परिसरात मागील ४ दिवसांपासून उष्णतेची लाट कायम आहे. बुधवारी (ता.१५) पारा ४० अंशावर स्थिरावला. उष्म्यामुळे निपाणीकर घामाघूम होत आहेत. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने प्रमुख चौक, मुख्य रस्ते, बाजारपेठ दुपारी ओस पडत आहेत. एप्रिलमध्ये उन्हाचा …
Read More »सांगली जवळील मांगले संघ ‘अरिहंत’ चषकाचा मानकरी
कोल्हापूरचा संघ उपविजेता; नारायणवाडी, हिंडलगा विभागून तृतीय क्रमांक निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहतर्फे श्री छत्रपती शिवाजीनगर फ्रेंड सर्कल यांच्या संयोजनाखाली म्युनिसिपल मैदानावर आयोजित ‘अरिहंत चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मांगले (जि.सांगली) येथील संघाने विजेतेपद पटकावले. या संघाला सहकाररत्न उत्तम पाटील व मान्यवरांच्या हस्ते २ लाखाचे रोख …
Read More »पुन्हा वाजणार सनई-चौघडे
एप्रिलच्या उत्तरार्धात आठ योग; अधिकमासात लागणार ‘ब्रेक’ निपाणी (वार्ता) : प्रतीक्षेनंतर पुन्हा लग्नाचा बार उडणार असून सनई-चौघड्यांचा आवाज कानी पडणार आहे. एप्रिलमध्ये बुधवारपासून (ता. १५) शुभ मुहूर्तांना पुन्हा सुरुवात होणार आहे. त्यानंतर लग्नसोहळ्यांना प्रारंभ होणार आहे. एप्रिलच्या उत्तरार्धात आठ मुहूर्त आहेत. १६ मार्चपासून लग्नासाठी शुभमुहूर्त नव्हते. अर्थात हा महिनाभराचा …
Read More »डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त क्रांती स्तंभास मानवंदना
निपाणी (वार्ता) : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कॅप्टन मनोहर गायकवाड यांनी क्रांती स्तंभाला मानवंदना दिली. ३ डिसेंबर १९३८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची म्युन्सिपल हायस्कूल येथील सभेमध्ये दलित शोषीत वंचित बहुजनांना शासनकर्ती जमा झाली पाहिजे असा क्रांतिकारी संदेश दिला. या संदेशाची आठवण राहावी म्हणून क्रांतीस्तंभाची …
Read More »बॉक्स हापूसचा, आंबे मात्र कर्नाटकी
निपाणी बाजारपेठेत सर्रास विक्री ; ग्राहकांचे होतेय फसवणूक निपाणी (वार्ता) :;जी.आय २९ मानांकन मिळालेला व जगभर प्रसिद्ध असलेल्या हापूस आंब्याचा हंगामाला अद्याप सुरुवातच झालेली नाही. तरीही निपाणी बाजारपेठेत कर्नाटकातून आलेल्या आंब्यांची हापूस म्हणून विक्री सुरू झाल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे. बॉक्स हापूसचा असला तरी त्यामध्ये आंबे मात्र कर्नाटकातील आहेत.शिवाय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta