Monday , September 21 2026
Breaking News

कुर्लीत कर्मवीर भाऊराव पाटील जयंती व पारितोषिक वितरण कार्यक्रम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती व पारितोषिक वितरण कार्यक्रम मंगळवारी (ता. २२) कुर्ली येथे आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.१५ वाजता पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेच्या सवाद्य मिरवणुकीने होणार आहे. गावातून मिरवणूक काढल्यानंतर सकाळी १०.१५ वाजता सिद्धेश्वर विद्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल राठोड उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्कूल कमिटी व स्कूल बेटरमेंट कमिटीचे सदस्य, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, पालक संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रतिनिधी तसेच शालेय संसद मंडळाने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पिकांसोबत शेतकऱ्यांची स्वप्नेही करपली!

Spread the love  निपाणी तालुक्यात पावसाची उघडीप; सोयाबीन, ऊस करपल्याने शेतकरी हवालदिल निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *