Monday , May 25 2026
Breaking News

निपाणी

अभ्यासिकामुळे व्यक्तिमत्व विकास शक्य

  तहसीलदार सुरेश मुंजे; निपाणीत ज्ञानज्योती अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : व्यक्तिमत्व विकास, बौद्धिक प्रगती आणि जीवनातील यशासाठी ग्रंथालय व अभ्यासिका केंद्रांना महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावल्यास त्यांचा बौद्धिक विकास होण्यासह त्याच्या बळावर कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येते. स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करणाऱ्या युवकांना अशा अभ्यासिका केंद्रांमुळे …

Read More »

संविधानाच्या निर्मितीत डॉ. आंबेडकरांचे योगदान महत्त्वाचे

  प्रा. मुकुंद कांबळे : शताब्दी महोत्सव कमिटीतर्फे अभिवादन निपाणी (वार्ता) : भारत देशाची खरी ओळख त्याच्या विविधतेत आणि लोकशाही व्यवस्थेत आहे. या सर्वांचा पाया म्हणजे भारतीय संविधान. देशाच्या प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि संधी देणारे हे संविधान आजही आपल्या समाजाला योग्य दिशेने मार्गदर्शन करत आहे. संविधानाच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब …

Read More »

धार- पवार समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील

  सागर पाटील ; निपाणीत समाजाची बैठक निपाणी (वार्ता) : अनेक समाजाची मंडळी एकत्रीत येवून समाजाचा विकास साधत आहेत. अशा परिस्थितीमध्ये धार-पवार परिवार विकासात मागे पडत होता. त्यामुळे १३ वर्षापूर्वी श्रीमंतराजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानची स्थापना केली. त्या माध्यमातून ५ लाख धार-परिवाराला एकत्रीत करून त्यांचे जीवन उज्वल करण्याचे काम हाती …

Read More »

युद्धाचा परिणाम थेट स्वयंपाकघरापर्यंत

  खाद्यतेलांची प्रतिकिलो २०-२५ रुपयांनी दरवाढ ; महिलांचे स्वयंपाकाचे बजेट कोलमडले निपाणी (वार्ता) : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळित झाली असून त्याचा परिणाम आता जीवनावश्यक वस्तूंवर दिसत आहे. स्वयंपाकाच्या गॅसनंतर आता खाद्यतेलाच्या किमतीतही वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घरखर्चावर ताण वाढला आहे. सध्या निपाणी बाजारपेठेत सोयाबीन, पाम, सूर्यफूल तेलाची …

Read More »

समाजरत्न पुरस्काराने निपाणीमधील नामदेवराव चौगुले बेळगावमध्ये सन्मानित

  निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील श्री‌ सिद्धरामेश्वर ॲग्रो केंद्राचा ३२ व्या वर्धापन दिन काकती येथे पार पडला. अम्मा फाऊंडेशनचे संस्थापक बाळासाहेब उदागट्टी व भरमण्णा एल. उप्पार (राज्यमंत्री, कर्नाटक सरकार) वाढदिवसही पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५१ समाजसेवकांचा सन्मान करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात …

Read More »

यरनाळच्या अंबिकादेवी यात्रेतील शर्यतीत मुरगुडच्या राणा मांगलेंची बैलगाडी प्रथम

  निपाणी (वार्ता) : यरनाळ (ता. निपाणी) येथील ग्रामदैवत अंबिकादेवी यात्रेनिमित्त आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये मुरगूडच्या राणा मांगले यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून १० हजार १ रुपये रोख व ढाल बक्षीस मिळविले. या शर्यतीत रेंदाळच्या शरद पुणेकर यांच्या बैलगाडीने द्वितीय क्रमांकाचे ७००१ रुपये आणि कणेरीच्या सुनील पाटील यांच्या बैलगाडीने ५००१ …

Read More »

सहकारासह क्रीडा क्षेत्रालाही प्राधान्य

  सहकारत्न उत्तम पाटील ; निपाणीत अरिहंत चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन निपाणी वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत समूहातर्फे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याचा सर्वांना लाभ होत आहे. केवळ सहकारापुरतेच अरिहंत संस्था मर्यादित नसून धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातही संस्थेचे कार्य सुरू आहे. त्याचा मतदारसंघातील नागरिकांना चांगला उपयोग …

Read More »

वैद्यकीय सेवेबद्दल बेनाडीतील राजू मधाळे “बेनाडी नगरी” पुरस्काराने सन्मानित

  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील रहिवाशी आणि सध्या बेळगाव के.एल.ई. हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असलेले राजू मधाळे यांच्या वैद्यकीय सेवेबद्दल प्रसिद्ध कीर्तनकार, व्याख्याते गणेश शिंदे यांच्या हस्ते ‘बेनाडी नागरी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. येथील जय जवान जय किसान सहकारी संघाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजू मधाळे …

Read More »

निपाणीत शनिवारपासून रंगणार ‘अरिहंत’ चषक क्रिकेट स्पर्धा

  प्रकाशझोतासह गॅलरीची व्यवस्था; सहकाररत्न दिवंगत रावसाहेब पाटील जयंती निमित्त आयोजन निपाणी वार्ता) : बोरगाव येथील सहकाररत्न दिवंगत रावसाहेब पाटील (दादा) यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त, अरिहंत उ‌द्योग समूह व छत्रपती शिवाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवारपासून (ता.११) ‘अरिहंत चषक पर्व -३ – २०२६’ दिवसरात्र टेनिस बॉल आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निपाणीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आला असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कर्नाटक दलित संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त प्रा. बी. कृष्णाप्पा स्थापित कर्नाटक दलित संघर्ष समिती राज्यध्यक्ष गुरूमुर्ती, …

Read More »