
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील आझाद गल्लीमध्ये युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सागर रामा डवरी (वय २४) असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत निपाणी शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सागर हा मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करत होता. गेल्या काही महिन्यांपासून त्याला दारूचे व्यसन जडले होते. त्याने राहत्या घरी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती नागरिकांनी निपाणी शहर पोलिसांना दिली.
शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपनिरीक्षक एस. एस. नरसपण्णावर, हवालदार सुनीता कांबळे, कॉन्स्टेबल प्रभू सिद्धांतगीमठ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी सागर याची आई सुनीता डवरी यांनी निपाणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेचा तपास उपनिरीक्षक गंगाप्पा पुजेरी करत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta