Friday , October 23 2026
Breaking News

पालकमंत्र्यांना भेटून यमगर्णी गायरान प्रश्न मिटविणार

Spread the love

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे; आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन दिले आश्वासन

निपाणी (वार्ता) : यमगर्णी येथील गायरान जमीन वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी पुकारलेल्या ‘गायरान बचाव’ उपोषणाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी उपोषणकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गावकऱ्यांच्या या आंदोलनात स्वतः सामील होत आपला जाहीर पाठिंबा दर्शवला. शिवाय पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि खासदार प्रियंका जारकीहोळी यांच्याशी भेट घेऊन हा प्रश्न तात्काळ निकालात काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली.
लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले की, गायरान जमिनीचा प्रश्न अत्यंत गंभीर असून गावकऱ्यांच्या भावना रास्त आहेत. हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी त्यांनी आंदोलन स्थळी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी तसेच चिकोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्याशी सविस्तर चर्चा करुन हा विषय सोडवितो आसे सांगितले. यावेळी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून लवकरात लवकर कायदेशीर व सकारात्मक मार्ग काढून ही समस्या सोडवली जाईल, असेही स्पष्ट केले. आंदोलनाला बळ देण्यासाठी आणि गावकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमीटी सदस्य दीपक सावंत, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष नासीरखान इनामदार, युवक काँग्रेस उपाध्यक्ष लोकेश घस्ते, नितीन नेपीरे, प्रशांत पोकले, बाळासाहेब कमते, फारूक पटेल, समीर काझी यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या समस्येवर तोडगा निघेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव परिसरात दसऱ्यानिमित्त आयुध पूजनासह सीमोल्लंघन सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : विजयादशमी निमित्त बोरगाव शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमासह आयुध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *