Friday , October 23 2026
Breaking News

ममदापूर (के.एल.) अंबिका मंदिर यात्री निवासाचे रविवारी उद्घाटन

Spread the love

 

नवरात्रोत्सवानिमित्त कर्नाटक, महाराष्ट्रातील भाविकांची गर्दी

निपाणी (वार्ता) : प्रति तुळजाभवानी मानण्यात येणाऱ्या ममदापूर (के. एल.) येथील अंबिका मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. नवरात्र निमित्त महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. याशिवाय आमदार शशिकला जोल्ले यांनी धर्मादाय खात्यामधून बांधलेल्या यात्री निवासाचे उद्घाटन रविवारी (ता.१८) होणार असल्याची माहिती बाळासाहेब कदम यांनी दिली.
नवरात्रोत्सवानिमित्त बुधवारी (ता.१४) रोजी इचलकरंजी येथील बालावधूत भजनी मंडळ आणि कुरुंदवाड येथील हरी भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. गुरुवारी (ता.१५) श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ (इचलकरंजी), निपाणी येथील विठ्ठल सांप्रदायिक भजनी मंडळ आणि तुळशी महिला भजनी मंडळ यांचे भजन, शुक्रवारी (ता.१६) रोजी गजानन महाराज महिला भजनी मंडळ, योगिनी महिला भजनी मंडळ आणि लक्ष्मी नरसिंह भजनी मंडळ (इचलकरंजी) यांचे कार्यक्रम, शनिवारी (ता. १७ रोजी श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ आणि गजानन महिला भजनी मंडळाचे भजन, रविवारी (ता.१८) चुगणा महिला भजनी मंडळ (इचलकरंजी) आणि माजगली भजनी मंडळाचे कार्यक्रम व सायंकाळी ४ वाजता हुपरी येथील अमृतधारा गीतमंचाचा भक्तिसंगीत कार्यक्रमहोणार आहे. सोमवारी (ता. १९) सकाळी १० वाजता नांद्रे येथील तुळजाभवानी जागरण-गोंधळ मंडळ तर दुपारी १ वाजता शिवमल्हार जागरण गोंधळ मंडळाचा कार्यक्रम होणार आहे.सायंकाळी ६ निपाणी येथील नटराज नृत्य कला केंद्र आणि श्रेयल शहा यांचा गरबा नृत्याचा कार्यक्रम तर मंगळवारी (ता.२०) खंडेनवमी, विजयादशमी दसरा आणि सायंकाळी ६ वाजता सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव परिसरात दसऱ्यानिमित्त आयुध पूजनासह सीमोल्लंघन सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : विजयादशमी निमित्त बोरगाव शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमासह आयुध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *