Saturday , October 24 2026
Breaking News

निपाणी

ममदापूरमध्ये विजयादशमी निमित्त सीमोल्लंघन

  निपाणी (वार्ता) : नवरात्र उत्सवाचा अखेरच्या दिवशी ममदापूर (के.एल.) विजया दशमी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी सीमोलंघनाचा कार्यक्रम पार पडला. निरंजन पाटील- सरकार यांच्या हस्ते शमीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास शहाजीराव जगदाळे, धीरज जगदाळे, कृष्णवर्धन पाटील (छोटे सरकार), जिजाऊ चव्हाण- पाटील, चंद्रशेखर पाटील, शिवराज चव्हाण, अभिजीत पाटील, प्रकाश …

Read More »

‘एसआयआर’ प्रक्रिया रद्द करण्यासाठी काँग्रेसतर्फे ज्ञानेश कुमार यांच्या पुतळ्याचे दहन

  निपाणी (वार्ता) : ‘एसआयआर’ प्रक्रिया तत्काळ रद्द करावी, शिवाय चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आलेल्या मतदारांची नावे पुन्हा सामाविष्ठ करावीत, ही मागणी करीत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध केला. चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे म्हणाले, ‘एसआयआर’ प्रक्रिया तत्काळ रद्द करावी आणि …

Read More »

बोरगाव परिसरात दसऱ्यानिमित्त आयुध पूजनासह सीमोल्लंघन सोहळा

  निपाणी (वार्ता) : विजयादशमी निमित्त बोरगाव शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमासह आयुध पूजनासह सीमोल्लंघन पार पडला. यावेळी एकमेकांनी आपट्याची पाने देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. सहकाररत्न उत्तम पाटील व पृथ्वीराज अभिनंदन पाटील यांच्या हस्ते दसरा व आयुध पूजन सोहळा पार पडला. दसरा हा सण सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईटावर विजय …

Read More »

कक्केरी यात्रेसाठी आलेल्या १८ वर्षीय युवकाचा तलावात बुडून मृत्यू

  हुलिकेरी येथील इंदिरम्मा तलावातील घटना; अळणावर पोलिसांत नोंद बेळगाव : जत्रेचा उत्साह आणि नातेवाईकांच्या भेटीचा आनंद सुरू असतानाच एका दुर्दैवी घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कक्केरी येथील श्री बिष्टादेवी यात्रेनिमित्त नातेवाईकांकडे आलेल्या १८ वर्षीय युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (२१ ऑक्टोबर) हुलिकेरी गावातील इंदिरम्मा तलावात घडली. …

Read More »

समाज, देश आणि धर्माचे काम युवकांनी हाती घ्यावे

  बाळासाहेब जासूद : निपाणीत दुर्गामाता दौडीची सांगता निपाणी (वार्ता) : युवकांमध्ये समाज आणि देश बदलण्याची ताकद आहे. पण अलीकडचा तरुण दिशाहीन बनल्याने त्यांना मार्गदर्शनची गरज आहे. त्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. तरच सध्याची पिढी योग्य पद्धतीने काम करू शकेल. समाज, देश आणि धर्मासाठी युवा मंडळींनी पुढे येण्याचे …

Read More »

निपाणीत पारंपरिक पद्धतीने विजयादशमी

  आमराई रेणुका मंदिरांत गर्दी; शमी पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम निपाणी (वार्ता) : निपाणी येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर-सरकार राजवाड्यामध्ये ऐतिहासिक व पारंपारिक पद्धतीने दसरोत्सव पार पडला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी अमराईतील रेणुका मंदिराजवळ सोने लुटून दसरा साजरा करण्यात आला. मंगळवारी (ता.२०) सकाळी तुळजाभवानीला अभिषेक घालून घट …

Read More »

दसऱ्याच्या मुहूर्तावर निपाणीत कोट्यवधीची उड्डाणे

  १६७ दुचाकींची विक्री; मुहूर्तावर सराफी दुकानात गर्दी निपाणी (वार्ता) : सोने-चांदीसह दुचाकी खरेदीस प्राधान्य देऊन ग्राहकांनी बाजारपेठेत शनिवारी (ता. १२) दमन्याचा मुहूर्त साधला. महागाईचे असतानाही खरेदीसाठी दिवसभर गदीं इवली होती. सोने ७६ हजार रुपये तोळा, तर चांदी १३ हजार रुपये किलो असतानाही निपाणी भागातील नागरिकांनी कोट्यवधी रुपयांचे सोने खरेदी …

Read More »

प्रती तुळजाभवानी ममदापूर अंबिका मंदिरात जागरणनिमित्त दिवसभर भाविकांची गर्दी

    निपाणी (वार्ता) : ममदापूर (के. एल. ता. निपाणी) येथील प्रति तुळजाभवानी समजल्या जाणाऱ्या अंबिका मंदिरात जागरणानिमित्त तेल घालण्यासह दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. जागरणानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे मूर्ती पुजारांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी निपाणी, इचलकरंजी, …

Read More »

कोडणीतील कार्यकर्त्यांचा सहकाररत्न उत्तम पाटील गटात जाहीर प्रवेश

  निपाणी (वार्ता) : कोडणी येथील श्री. अरिहंत सभागृहात सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कोडणी येथील अनेक कार्यकर्त्यांनी ‘उत्तम पाटील’ गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी पाटील यांच्या हस्ते गटात नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करून पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देत, सर्वांना सोबत घेऊन जनसेवेचे कार्य …

Read More »

वातावरणातील बदलामुळे निपाणी भागातील शेतकऱ्यांचा आंतरपीकाकडे कल वाढतोय

  निपाणी (वार्ता) : यंदाच्या वातावरणातील बदलामुळे शहर आणि ग्रामीण भागातील अनेक शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत आंतरपीक घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने बेनाडी येथील प्रगतशील शेतकरी रावसाहेब जनवाडे यांनी एक एकर क्षेत्रामध्ये झेंडू फुलांची लागवड केली असून त्यामध्ये मिरचीचे पीक घेतले आहे. ही दोन्ही पिके …

Read More »