Friday , October 23 2026
Breaking News

प्रती तुळजाभवानी ममदापूर अंबिका मंदिरात जागरणनिमित्त दिवसभर भाविकांची गर्दी

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : ममदापूर (के. एल. ता. निपाणी) येथील प्रति तुळजाभवानी समजल्या जाणाऱ्या अंबिका मंदिरात जागरणानिमित्त तेल घालण्यासह दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. जागरणानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे मूर्ती पुजारांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी निपाणी, इचलकरंजी, कागल, हुपरी, बेळगाव, मुरगुड, सेनापती कापशीसह निपाणी ग्रामीण भागातील भाविकांनी दिवसभर देवीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर कमिटीतर्फे दर्शनासाठी महिला आणि पुरुषांसाठी दर्शन रांगा केल्या होत्या. त्यामुळे भाविकातून समाधान व्यक्त झाले. मंगळवारी (ता.२०) सायंकाळी सिमोल्लंघनाचा असून त्यानिमित्त अंबिका पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी परिसरातील भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘एसआयआर’ प्रक्रिया रद्द करण्यासाठी काँग्रेसतर्फे ज्ञानेश कुमार यांच्या पुतळ्याचे दहन

Spread the love  निपाणी (वार्ता) : ‘एसआयआर’ प्रक्रिया तत्काळ रद्द करावी, शिवाय चुकीच्या पद्धतीने वगळण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *