Friday , October 23 2026
Breaking News

कोडणीतील कार्यकर्त्यांचा सहकाररत्न उत्तम पाटील गटात जाहीर प्रवेश

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : कोडणी येथील श्री. अरिहंत सभागृहात सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कोडणी येथील अनेक कार्यकर्त्यांनी ‘उत्तम पाटील’ गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी पाटील यांच्या हस्ते गटात नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करून पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देत, सर्वांना सोबत घेऊन जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
उत्तम पाटील यांनी, कार्यकर्त्यांचा वाढता विश्वास, भक्कम संघटन आणि जनसेवेचा ध्यास या बळावर संघटनात्मक वाटचाल अधिक मजबूत होत आहे. आहे. या पुढील काळातही नागरिकांनी आपल्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले.
सुभाष खवरे, लखन खवरे, पिंटू बाबू पठाडे, पवन करडे, संजय हेर्ले, आकाश अशोक खोत, आदेश खवरे, बबन करडे, हरी पाटील, उमेश भोसले, आकाश नलवडे, विशाल किल्लेदार, अतुल नलवडे, रोहित नलवडे, पियुष भाट, अमोल खवरे, विनायक करडे, युवराज हणीमनाळे यांच्यासह कार्यकर्त्यानी उत्तम पाटील गटात प्रवेश केला.
यावेळी बेडकिहाळचे माजी ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील, अभिनंदन बेनाडे, कोंडणीचे महेश पाटील, बाबासाहेब खोत, संजय खोत, सुशांत खवरे, प्रकाश खवरे, विनायक खवरे, सुबराव खोत, आनंदा खवरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘एसआयआर’ प्रक्रिया रद्द करण्यासाठी काँग्रेसतर्फे ज्ञानेश कुमार यांच्या पुतळ्याचे दहन

Spread the love  निपाणी (वार्ता) : ‘एसआयआर’ प्रक्रिया तत्काळ रद्द करावी, शिवाय चुकीच्या पद्धतीने वगळण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *