Friday , October 23 2026
Breaking News

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक बुधवारी

Spread the love

बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता रंगुबाई भोसले पॅलेस, रामलिंग खिंड गल्ली, बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे.

१ नोव्हेंबर काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या मूक फेरीसंदर्भात या बैठकीत विचारविनिमय करण्यात येणार आहे. या बैठकीला समितीचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

शुभम शेळके आणि मनोहर हुंदरे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Spread the love बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके आणि मनोहर हुंदरे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *