Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी

रिंगण सोहळ्याने निपाणी नगरी दुमदुमली!

  वारकरी, भाविकांचा उत्साह : माऊली, माऊलीचा गजर निपाणी (वार्ता) : टाळ मृदंगाचा गजर, हातात पताका, विणेकरी, चोपदार, पालखी सोहळा, आणि माऊली माऊली च्या गजरात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अंकली येथील अश्वांचे येथील म्युनीशिपल हायस्कूलच्या पटांगणावर रविवारी (ता.२८) दुपारी प्रथमच श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार, श्रीमंत विजयराजे देसाई निपाणकर सरकार, श्रीमंत …

Read More »

हिंगणगाव येथे उद्या शांतिसागरजी महाराजांची पुण्यतिथी

रावसाहेब पाटील यांची माहिती: विविध कार्यक्रमाचे आयोजन निपाणी (वार्ता) : दक्षिण भारत जैन सभेचे वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या वतीने विसाव्या शतकातील प्रथमाचार्य, चारित्र्य चक्रवर्ती, समाधीसम्राट १०८ आचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांची ६७ वी पुण्यतिथी महोत्सव हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ जि. सांगली) सोमवारी (ता. २९) होणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे …

Read More »

महाप्रसादातून सामाजिक सलोखा : कृष्णवेणी गुर्लहोसूर

निपाणीत शनी अमावस्या सोहळा  निपाणी (वार्ता): महाप्रसादासाठी सर्व जाती-धर्माचे लोक एकत्रित येत असून स्नेहभोजनातून जातीय सलोखा निर्माण होतो. अन्न हे पूर्णब्रह्म आहे. त्यामुळे अन्नदान झाले पाहिजे व ते टिकले पाहिजे, असे उपक्रम विविध ठिकाणच्या देवस्थान व मंदिर कमिटीने राबवून सामाजिक सलोखा राखावा, असे आवाहन शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर …

Read More »

हंचिनाळ येथे गॅस सिलेंडर, कोरोना मृतांच्या वारसांना धनादेश वितरण

कोगनोळी : हंचिनाळ के.एस (तालुका निपाणी) येथे मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या उज्वल गॅस योजनेतून गौराबाई पाटील, छबुताई भिवसे, भाग्यश्री पाटील-चिनाप, शामबाला भिवसे, उमा जाधव या गरीब व गरजू महिलांना गॅस सिलेंडरचे वितरण आडी – हंचिनाळ ग्रुप ग्रामपंचायतीचे अध्यक्ष बबन हावलदार,  ग्रामपंचायत सदस्य …

Read More »

रत्नशास्त्री मोतीवाला यांचे सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान

उत्तम पाटील : शुभरत्न केंद्रास सदिच्छा भेट निपाणी (वार्ता) : दिवंगत एच. ए. मोतीवाला यांनी निपाणी शहर आणि परिसरात मोठे सामाजिक कार्य केले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र ए. एच. मोतीवाला हे अशहिमतीने त्यांची उणीव भरून काढत आहेत. एच. ए. मोतीवाला यांचा वारसा खंबीरपणे ते चालवत असून त्यांचाही नावलौकिक वाढत …

Read More »

सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक प्रवेश योजना राबवा

महाराष्ट्र एकीकरण समिती : मंत्री राजेश क्षीरसागर यांना निवेदन  निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र सरकारने शिवाजी विद्यापीठ अंतर्गत कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिक गावातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांपासून मोफत, सवलतीत प्रवेश योजना सुरु केली आहे. सदरचा निर्णय हा स्वागतार्ह आहे तसेच सीमाभागातील मराठीपण जोपासनेसाठी पोषक आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांनी जास्तीत …

Read More »

निपाणीत संत सेना महाराज पुण्यतिथी

  निपाणी (वार्ता) : वारकरी संप्रदायातील महान संत शिरोमणी श्री सेना महाराज यांची पुण्यतिथी रोजी येथील साखरवाडी मधील संत सेना भावनात करण्यात आली. त्यानिमित्त विविध कार्यक्रम झाले. संत सेना महाराज पालखी व भजनी मंडळाच्या मिरवणुकीने पुण्यतिथीची सुरुवात करण्यात आली. पालखी श्री संत सेना भवन ते सटवाई रोड नरवीर तानाजी चौक …

Read More »

निपाणीत रिंगण सोहळ्याची तयारी पूर्णत्वाकडे

  श्रीमंत दादाराजे देसाई सरकार : रविवारी होणार सोहळा निपाणी (वार्ता) : शहर व परिसरासाठी प्रथमच भव्य प्रमाणात होत असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या अश्वाच्या गोल व उभे रिंगण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. येथील म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर रविवारी (ता.28) होणार्‍या या सोहळ्यात शहर व परिसरातील 50 हून अधिक …

Read More »

कोगनोळी महामार्गाजवळ ट्रॅक्टर-ट्रॉलीची चोरी

वीट उत्पादकाला लाखो रुपयांचा फटका कोगनोळी : वीट उत्पादकाच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीची चोरी झाल्याची घटना बुधवारी सकाळी कोगनोळी (तालुका निपाणी) येथील राष्ट्रीय महामार्गाजवळ उघडकीस आली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, सुळकूड (तालुका कागल) येथील पांडूरंग जाधव यांची कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारशेजारी इंग्लिश मेडियम स्कूलजवळ वीट निर्मितीचा कारखाना …

Read More »

दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर निपाणीत गोविंदांचा थरार!

  एकाग्रता, शिस्त, सातत्य : अंगमेहनत, धाडसाचा अनुभव निपाणी (विनायक पाटील) : कोरोना महामारीपूर्वी मुंबई, सांगली, कोल्हापूर, गडहिंग्लज, पुणे शहरापर्यंत मानाच्या अन् लाखोंच्या हंड्या फोडणारी नावाजलेली गोविंदा पथके पुन्हा एकदा सज्ज झाली होती. बुधवारी (ता.24) सायंकाळी निपाणी येथील चाटे मार्केट मधील व्यापारी मित्र मंडळतर्फे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात ’गो गो गोविंदा…’ …

Read More »