Tuesday , September 17 2024
Breaking News

निपाणी

‘अंकुरम’मध्ये नाटीकेच्या माध्यमातून महिला दिन

निपाणी (वार्ता) : येथील श्रीनगर मधील अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूलमधील सर्व शिक्षक व कर्मचारी सर्व स्टाफ हा महिलांचा आहे. शाळेमध्ये नर्सरी ते पाचवीपर्यंत इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते. शाळेच्या स्थापनेचा मुळात उद्देशच असा होता की ग्रामीण भागातील व शहरी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याच उद्देशाने या …

Read More »

संकेश्वरचा धावपटू प्रविण गडकरी पुणे मॅरेथॉनमध्ये चमकला

संकेश्वर (प्रतिनिधी) :  संकेश्वरचा धावपटू प्रविण एम. गडकरी यांनी नुकत्याच पार पडलेल्या ३५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय १० कि.मी. धावण्याच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस पटकाविले आहे. पुणे मॅरेथॉनमध्ये देशभरातील ५०० धावपटूंनी सहभागी झाले होते.. त्यात संकेश्वरचा धावपटू प्रविण गडकरी यांचा सहभाग संकेश्वरचं नाव मोठं करणार ठरले आहे. धावपटू प्रविणने …

Read More »

स्वसंरक्षण कला शिकणे गरजेचे

निकु पाटील : तायक्वांदो स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये निरोगी आरोग्य असणे गरजेचे आहे. शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईल व संगणक मधून बाहेर पडून शारीरिक कसरत करून निरोगी आरोग्य कमावणे हीच खरी संपत्ती आहे. तायक्वांदो सारख्या कला आत्मसात करून मुला-मुलींनी स्वसंरक्षण कला शिकणे गरजेचे आहे, असे मत दौलतराव …

Read More »

रेल्वे मार्ग न बदलल्यास आंदोलन : राजू पोवार

रयत संघटनेतर्फे निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव – कित्तूर-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी  अर्थसंकल्पामध्ये ९२७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. यामध्ये बेळगाव परिसरातील विविध ठिकाणची सुपिक जमीन संपादित केली जात आहे. यामुळे शेतकरी कंगाल होऊन भूमिहीन होण्याची भीती आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गासाठी सुपिक जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा …

Read More »

कुर्ली येथील जवानाचा मृत्यू

कोगनोळी : कुर्ली तालुका निपाणी येथील जवान नवनाथ आप्पा दिवटे यांचा सेवा बजावत असताना अल्पशा आजाराने निधन झाले. जवान नवनाथ यांच्या निधनाची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली. जवान नवनाथ हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण करून सैन्यदलात भरती झाले होते. नवनाथ हे कायम हसतमुख असल्याने त्यांचा गावांमध्ये मोठा मित्रपरिवार देखील …

Read More »

कोगनोळी फाट्यावर होणारा ब्रिज रद्द

ग्रामपंचायत सदस्य सुनिल माने : शेतकऱ्यांच्या मागणीला यश कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार असून याठिकाणी कोगनोळी फाट्यावर उड्डाणपूल होणार होते. यामुळे येथील शेतकऱ्यांची सुपीक जमीन यामध्ये जाणार होती. यासाठी येथील शेतकऱ्यांनी अनेक वेळा अधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन ब्रिज रद्द करण्यात यावा अशी मागणी केली होती. येथील …

Read More »

राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिज रद्द झालेल्याचा जबाबदार व्यक्तीने खुलासा करावा

पंकज पाटील : राष्ट्रीय महामार्गावरील जादा जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार असून या ठिकाणी असणाऱ्या प्रसाद नर्सरी पासून दूधगंगा नदी पर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनी या प्रकल्पामध्ये जात आहे. यामुळे शेतकरी भूमिहीन होणार आहे. आतापर्यंत प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून या ठिकाणी होणारा ब्रिज रद्द करण्यात आला …

Read More »

मुलांना संस्कारमय शिक्षण देण्याची गरज

प्रा. डॉ. अच्युत माने :लिटल अँजलस्कूलचे स्नेहसंमेलन निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात सर्वत्र शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. संस्कारमय शिक्षणाची उणीव भासत आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रसन्नकुमार गुजर यांनी विविध शाळेच्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे. याही शाळेची जबाबदारी त्यांनी घेतल्याने शाळेचा नावलौकीक वाढत आहे. मुलांना …

Read More »

मनःशांतीसाठी सत्संग सोहळ्यांची गरज

सचिनदादा पवार : निपाणीत एक दिवशीय कीर्तन सोहळा निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगात मनुष्य क्षणिक सुखाच्या मागे धावत सुटला आहे. सत्ता संपत्ती गोळा केल्याशिवाय चैन पडेनासे झाले आहे. मात्र आपला देह शाश्वत नसून तो अल्पावधीतच आहे. त्यामुळे गोळा केलेले धन हे कुबेराची आहे. मनशांतीसाठी सत्संग सोहळ्याची गरज असून त्यामध्ये प्रत्येकाने …

Read More »

सोयाबीनला अच्छे दिन…

संकेश्वर (प्रतिनिधी) : यंदा शेतकऱ्यांना सोयाबीन पिकांने मालामाल केलेले दिसताहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनचा दर प्रति किलो ८० रुपयांपर्यंत पोचला होता. आता दरात थोडीशी घसरण होऊन सोयाबीनला ७४-७५ रुपये दर मिळू लागला आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे तेल दरात मोठी वाढ होऊ लागल्याने सोयाबीन दरात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. पंधरवड्यापूर्वी सोयाबीनचा दर …

Read More »