Thursday , September 19 2024
Breaking News

निपाणी

पालखी प्रदक्षिणाने बाबा महाराज पुण्यतिथी सोहळ्याची सांगता

निपाणी (वार्ता) : येथील दर्गा संस्थापक संत बाबा महाराज चव्हाण पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. गेले आठ दिवस ज्ञानेश्वरी पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम पार पडले. शनिवारी शेवटच्या दिवशी दिंडी प्रदक्षिणा चव्हाणवाडा ते दत्त मंदिर, हरी मंदिर, थळोबा पेठ, विद्या मंदिर मैदान समाधी स्थळ तसेच दर्गा भेट व …

Read More »

मानकापूर कुस्ती मैदानात दोन्ही कुस्त्या बरोबरीत

एकापेक्षा एक अशा कुस्त्यांनी मैदान रंगले : कुस्ती प्रेमींचा प्रतिसाद निपाणी (वार्ता) : माणकापूर येथील ग्रामदैवत श्री मलकारसिद्ध देवाच्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या कुस्ती मैदानात एकापेक्षा एक अशा कुस्त्या झाल्याने या कुस्ती मैदानाला कुस्ती प्रेमींच्याकडून प्रतिसाद मिळाला. प्रथम क्रमांकाची कुस्ती तुषार जगताप- अहमदनगर व हरीश देहल्ली-उत्तराखंड यांच्यात तर दुसर्‍या क्रमांकाची …

Read More »

बेळगांव जिल्हा बॅंक राज्यात ‘नंबर वन’ : गजानन क्वळी

संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यात नंबर वन ठरल्याचे नूतन संचालक गजानन क्वळी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, आपणाला नामनिर्देश संचालक म्हणून निवड केलेल्या भाजपाचे मंत्रीगण, खासदार आमदार या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे. राज्यातील जिल्हा बॅंकांत बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अव्वल स्थानावर …

Read More »

मंदिराच्या विकासासाठी प्रयत्नशील

उत्तम पाटील : माणकापूर मलकारसिद्ध यात्रा निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगात प्रत्येक जण भौतिक सुखाच्या मागे लागल्याने मनशांती मिळणे कठीण झाले आहे. प्रत्येकाला कामातून वेळ कमी पडत असल्याने देवधर्म व्रतवैकल्यांचा विसर पडत चालला आहे. परिणामी मानवी जीवन दिवसेंदिवस गुंतागुंतीचे बनत चालले आहे. अशा परिस्थितीत मनःशांतीसाठी मठ मंदिरांची गरज आहे. आपण …

Read More »

सैन्य दलासाठी सृजनशीलता, नेतृत्वगुण आवश्यक!

कर्नल विलास सुळकुडे : देवचंदमध्ये छात्रांचा सदिच्छा समारंभ निपाणी (वार्ता) : छात्रांनी यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतोय, असे न म्हणता दृढनिश्चय पूर्वक ‘मी यशस्वी होणारच’ असे ठामपणे सांगितले पाहिजे. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी दुसरा पर्यायच उरत नाही. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, बी. एस. एफ., सी आर पी एफ, आय सी एस एफ, आय. …

Read More »

रुग्णवाहिका निपाणी भागासाठी आधार ठरेल

युवा नेते उत्तम पाटील : ‘अरिहंत’तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय अनेक रुग्णांना रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागला. ही बाब लक्षात घेऊन बोरगाव आणि निपाणी येथे अरिहंत उद्योग समूह आणि पीकेपीएसतर्फे तात्पुरती रुग्णवाहिका आणि ऑक्सिजनची सोय …

Read More »

संकेश्वरात ‘स्वयंसिद्धा’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन : अरुणा कुलकर्णी

संकेश्वर (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त येत्या ६ मार्च २०२२ रोजी श्री शंकरलिंग समुदाय भवन येथे स्वयंसिद्धा कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आल्याची माहिती अरुणा कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी स्वयंसिद्धा कार्यक्रमाच्या संयोजिका नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, डॉ. श्वेता मुरगुडे, मंजुळा हतनुरी, शिल्पा कुरणकर, डॉ. विजयालक्ष्मी मिर्जी उपस्थित होत्या. अरुणा …

Read More »

राजकीय पाठबळ नसताना केलेले कार्य उल्लेखनीय

आमदार लखन जारकीहोळी : स्तवनिधीत सत्कार समारंभ निपाणी (वार्ता) : सहकाररत्न रावसाहेब पाटील, युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कोणतेही राजकीय पाठबळ नसताना अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून युवा नेते उत्तम पाटील यांनी सहकार सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. सामाजिक बांधिलकी जपत महापूर, अतिवृष्टी आणि कोरोना काळात अनेक कुटुंबांना मदतीचा …

Read More »

हुक्केरी पोलीसांकडून २२५ ग्रॅम गांजा जप्त

यल्लीमन्नोळी फाट्यावर कारवाई संकेश्वर (प्रतिनिधी) : हुक्केरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महंमदरफीक तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली हुक्केरी पोलीसांनी सापळा रचून चोरीछुपे, बेकायदेशीरपणे गांजा विक्री करणारे आरोपी अजय उर्फ अमर सुभाष कोळी (वय २४) राहणार तळवार गल्ली संकेश्वर, बबलू राजासाठी नाईकवाडी राहणार सोलापूर तालुका हुक्केरी यांच्याकडून लाल रंगाच्या प्लॅस्टिक कॅरी बॅगमधील २२५ …

Read More »

निपाणीतील रथोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा!

कर्नाटक महाराष्ट्रातील भाविकांची उपस्थिती : गुरूवारी होणार रथोत्सव निपाणी (विनायक पाटील) : येथील महादेव गल्लीतील श्री महादेव मंदिरामार्फत महाशिवरात्रीनिमित्त साजरा होणारा रथोत्सव म्हणजे असंख्य भक्तगणांचे श्रद्धास्थान आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या या रथोत्सवाने दैदिप्यमान इतिहास व परंपरा जपली आहे. प्रतिवर्षी भव्यदिव्य स्वरुप प्राप्त होणारा श्री महादेवाचा रथोत्सव भाविकांचे आकर्षण ठरला …

Read More »