Thursday , September 19 2024
Breaking News

निपाणी

मराठी अस्मितेसाठी संघर्ष करावा लागेल

प्रा. डॉ. अच्युत माने : निपाणीत हुतात्मा दिन गांभीर्याने निपाणी (वार्ता) : लोकशाही वृत्तीने चळवळ रुजली तरच आपल्या मागण्या मान्य होणार आहेत. अलीकडच्या काळात सौदेबाजी वाढले असून गुंडाचे राज्य सुरू झाले आहे. त्यामुळे भांडवलशाहीला उत्तेजन मिळत आहे. राजकारण आणि लोकशाही या दोन्ही बाजू वेगळ्या आहेत. तरुणाईला लोकशाहीच्या लढ्यात झोकून देऊन …

Read More »

शिवाजी पार्कमध्ये अश्वारुढ शिवाजी महाराज पुतळा उभारणार

युवा नेते उत्तम पाटील : बोरगावमध्ये जिजाऊ जयंती निपाणी (वार्ता) : बोरगाव शहराच्या सौंदर्यात भर पडताना नियोजित छत्रपती शिवाजी पार्क याचे सुशोभीकरण करण्यासाठी नगरपंचायतकडून अनुदान मंजूर झाले आहे. सध्या याचे काम प्रारंभ झाले असून लवकरच या ठिकाणी आपणासह अरिहंत उद्योग समूह व नगरपंचायतीच्या विशेष अनुदानातून अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा …

Read More »

गळतगा-भिमापूरवाडी रस्त्याचा निधी गेला कुठे

राजेंद्र वड्डर : उद्घाटन होऊनही कामाला प्रारंभ नाही निपाणी (वार्ता) : गळतगा- भिमापूरवाडी या एक किलो मीटर आंतरराज्य मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यासाठी नऊ महिन्यांपूर्वी मंत्री शशिकला जोल्ले यांनी कार्यकर्त्यासोबत वाजत गाजत रस्ता कामाचे उद्घाटन केले. पण प्रत्यक्षात कामाला प्रारंभ करण्यात आलेले नाही. त्यामुळे रस्त्याचा निधी गेला कुठे? …

Read More »

हंचिनाळ ते कोगनोळी रस्त्याच्या डांबरीकरणासंदर्भात मंत्री शशिकला जोल्ले यांना ग्रामस्थांतर्फे निवेदन

कोगनोळी (वार्ता) : हंचिनाळ ते कोगनोळी पाच किलोमीटर रस्त्याची मागील कित्येक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली असून या मार्गावरून वाहन चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. रस्त्याचे मजबूतपणे त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी निवेदनाद्वारे मंत्री शशिकला जोल्ले यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे. हंचिनाळ ते कोगनोळी हा रस्ता मागील कित्येक महिन्यांपासून खराब झाला असून रस्त्यात …

Read More »

सहकारी संघामुळेच शेतकर्‍यांचा विकास

लक्ष्मीसेन भट्टारक स्वामी : बोरगाव येथे जीनलक्ष्मी संस्थेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : शासकीय स्तरावर शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. पण अंमलबजावणी वेळेवर होत नाही. शेतकर्‍यांचे अडीअडचणी लक्षात घेऊन गरजवंतांना वेळेत पत मंजूर करून शेतकर्‍यांचा जीवन उंचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न ग्रामीण भागातील सहकारी संस्था व संघ करीत आहेत. गाव, समाज व शेतकर्‍यांचे …

Read More »

निपाणीत एकाच महाविद्यालयातील 18 विद्यार्थ्यांना लागण

ग्रामीण भागातील पाच जण पॉझिटिव्ह निपाणी (वार्ता) : सर्वत्र थैमान माजवलेल्या कोरोना महामारीची तिसरी लाट निपाणीत दस्तक न देता सरळ दहशत निर्माण करणारी ठरली आहे. गुरुवारी (ता.13) निपाणीतील एका प्रतिष्ठित महाविद्यालयाध्ये एकाच वेळी 18 विद्यार्थी कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. तर या व्यतिरिक्त उपनगर आणि ग्रामीण भागातील पाच जण …

Read More »

बेळगाव अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महानिंग नंदगावी यांची सीमा तपासणी नाक्याला भेट

कोगनोळी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे नवीन अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख महानिंग नंदगावी यांनी कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्‍या कर्नाटक सीमा तपासणी नाक्याला भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांनी या ठिकाणी सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली. अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख महानिंग …

Read More »

रुग्ण सापडूनही निपाणीकर बिनधास्त

प्रशासनाकडून उपायोजना नाही : शाळा बंद बार सुरू निपाणी (वार्ता) : शहरात दोन दिवसांपूर्वी कोरोनाने शिरकाव केला असून एकूण पाच रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे निपाणीत गेल्या तीन-चार दिवसांत रुग्ण संख्या वाढत चालली आहे. त्यामध्ये एका पोलीस कर्मचार्‍यांसह अन्य एकाच कोरोनाची लागण झाली. तीन दिवसांपूर्वी प्रतिभा नगर येथील 36 वर्षीय महिलेला …

Read More »

’ब्रेक के बाद’ पुन्हा शाळा बंद!

कोरोनाचे संकट : ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य निपाणी (वार्ता) : राज्यात कोरोना संक्रमणामुळे नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे मंगळवार (ता.11) पासून मंगळवार पर्यंत (ता.18) इयत्ता पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग प्रत्यक्षरीत्या बंद झाले आहेत. नव्या आदेशामुळे शाळांतील किलबिलाट पुन्हा थांबलेला आहे. शाळा बंद शिक्षण सुरू याअंतर्गत ऑनलाईन वर्गाला काही …

Read More »

कोगनोळीत वीस एकर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक

कोगनोळी (वार्ता) : येथील हणबरवाडी रोडवर असणार्‍या इनाम पट्टी मळ्यात वीस एकर उसाला शॉर्टसर्किटने आग लागून जळून खाक झाल्याची घटना मंगळवार तारीख 11 रोजी दुपारी 3 च्या सुमारास घडली. यामध्ये शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील हणबरवाडी रोडवर असणार्‍या इनाम पट्टी मळ्यात …

Read More »