Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी

पुर्वीप्रमाणे वार्षिक पाणी बील आकारून कामगाराचा थकीत पगार द्यावा

  निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा आवश्यक नाही. पाणी मीटर हे हवेच्या दाबाने फिरत आहे. त्यामुळे अनेक नागरिक पाणी बील आकारणी बाबतीत तक्रार करीत आहेत. पण संबंधित त्या बाबतीत लक्ष देत नाहीत. परिणामी हजारोंच्या पटीत अनेकांना पाणी बील आल्याने नागरीक त्रस्त आहेत. याशिवाय पाणीपुरवठा …

Read More »

शिक्षक दाम्पत्याकडून विद्यामंदिर शाळेला २५ बेंचची देणगी

  निपाणी (वार्ता) : चौगुले दाम्पत्य शिक्षक येथील विद्यामंदिर शाळेला एक लाख रुपये किमतीचे २५ बेंच प्रदान केले. नामदेव चौगुले व अपूर्वा चौगुले यांनी प्रजासत्ताक दिनी बेंच प्रदान करून दातृत्वाचा आदर्श निर्माण केला आहे. नामदेव चौगुले हे सध्या अर्जुनी येथील शाळेमध्ये प्रभारी मुख्याध्यापक तर त्यांच्या पत्नी अपूर्वा चौगुले या २५ …

Read More »

‘लक्ष्मी वेंकटेश’ क्रेडिट सौहार्दची निवडणूक बिनविरोध

  निपाणी (वार्ता) : येथील दिवंगत शामराव मानवी यांनी स्थापन केलेल्या श्री लक्ष्मी वेंकटेश क्रेडिट संवर्धन संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर अध्यक्षपदी धनंजय देशपांडे तर उपाध्यक्षपदी शरयू मानवी यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून चिकोडी येथील लेखा परीक्षण विभागाचे उपनिर्देशक सतीश आप्पाजीगोळ होते. यावेळी संचालकपदी अभय देशपांडे, शंतनू मानवी, …

Read More »

विद्यार्थ्याकडून वैश्विक तत्त्वे जोपासने गरजेचे

  अन्नपूर्णा कुरबेट्टी; रोव्हर्स, रेंजर्स विभागाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्याकडून वैश्विक तत्त्वे जोपासून या जगाचे आध्यात्मिक सौंदर्य वाढवणे शक्य आहे. जीवनात मानवी मूल्ये अंगीकारल्यानेच मानव इतर प्राण्यांपेक्षा वेगळा दिसतो. दैनंदिन जीवनात आपण याचे प्रत्यक्ष पालन कसे केले पाहिजे, याचा धडा ‘स्काऊट आणि मार्गदर्शक’ शिकवतात असे मत बेळगाव जिल्हा भारत …

Read More »

हुतात्मा स्मारकाजवळ शेतकरी स्मृती उद्यान करा

  हुतात्मा स्मारक समिती; नगरपालिका आयुक्तांना निवेदन निपाणी (वार्ता) : येथे झालेल्या तंबाखू उत्पादक शेतकरी आंदोलनात १३ शेतकरी हुतात्मा झाले होते. त्याची दखल संयुक्त राष्ट्र संघानेही घेतली होती. त्या घटनेमधील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ निपाणी येथील कोल्हापूर वेस वरील आंदोलन नगरात त्यांच्या नावाचे स्मृती फलकासह ऐतीहासिक समाधी स्थळ उभारण्यात आले आहे. तेथे …

Read More »

भेदभाव न करता विकास कामे करणार

  माजी आमदार काकासाहेब पाटील : हजरत राजेबागस्वार दर्गा विकास कामास प्रारंभ निपाणी (वार्ता) : राज्य सरकारच्या वक्फ खात्याकडून जत्राट येथील श्रध्दास्थान हजरत राजेबागस्वार दर्गा विकासासाठी ११ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५ लाख रुपये सुपूर्द करण्यात आले असून उर्वरित निधी लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती …

Read More »

निपाणीत वळूंच्या दहशतीमुळे नागरिक भितीच्या छायेखाली

  निपाणी (वार्ता) : शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील नेहरू चौकात झालेल्या दोन वळुंच्या झुंजीत दुकान व वाहनांचे नुकसान झाले आहे. वर्षापूर्वी याच ठिकाणी झुंज लागून नागरीक जखमी झाले होते. याशिवाय कोठीवले कॉर्नरजवळ थांबलेल्या महिलेस वळूने धक्का मारल्याची घटना घडली होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने या गंभीर घटनेकडे …

Read More »

भारतीय संविधान सामाजिक समतेचे प्रतीक : प्रा. सुरेश कांबळे

  गव्हाण येथे डॉ. आंबेडकर युवा संघाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : भारतीय समाजात हजारो जाती, धर्म, पंथ, भाषा अशा प्रस्थापित व्यवस्थेमध्ये केवळ एक वर्ग सोडून शेतकरी, कामगार, शोषित, वंचित, पीडित व स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे स्वविचाराचे अधिकार प्राप्त झाले नव्हते. अशा प्रवृत्तीमुळे एकाधिकारशाही निर्माण होऊन भारतीय समाज व्यवस्थेमध्ये मानवी मूल्य पायदळी …

Read More »

सिद्धिविनायक गणेश मंडळातर्फे हळदी -कुंकू

  निपाणी (वार्ता) : येथील शहराबाहेरील न्यू हुडको कॉलनीमधील श्री सिद्धिविनायक गणेश मंडळातर्फे हार्दिक कुंकू कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी नगरसेविका उपासना गारवे तर प्रमुख पाहुण्या म्हणून बोरगाव येथील विनय श्री अभिनंदन पाटील उपस्थित होत्या. प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते सचिन गारवे यांनी स्वागत केले. त्यानंतर व्यासपीठावरील मानेवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थिनींचा …

Read More »

मराठा आरक्षणामुळे मत्तीवडेत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे आनंदोत्सव

  निपाणी (वार्ता) : मनोज जरांगे यांनी आरक्षण मराठा समाजाला मिळाले पाहिजे. यासाठी गेली तीन महिने झाले उपोषण करून महाराष्ट्र सरकारकडून आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसले नाहीत. त्याचा आनंद उत्सव मत्तीवडे गावामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी छ. शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी अध्यक्ष बंडा पाटील यांच्या हस्ते …

Read More »