Tuesday , September 17 2024
Breaking News

संकेश्वर

संकेश्वर प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाला २३ लाख रुपये नफा, सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची १०८ वी सर्वसाधारण सभा संघाचे चेअरमन अप्पासाहेब शिरकोळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला उद्देशून बोलताना संघाचे चेअरमन अप्पासाहेब शिरकोळी म्हणाले, आमच्या प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाला चालू आर्थिक वर्षात २३ लाख ६८ हजार ८० रुपये नफा झाला आहे. सभासदांना …

Read More »

संकेश्वरात पंचमसालीचा जयजयकार…

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री बसवेश्वर सर्कल, चन्नम्मा सर्कल ते गावातील प्रमुख मार्गे आज पंचमसालीची भव्य बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीला दिव्य सानिध्य कुडलसंगम लिंगायत पंचमसाली प्रथम जगद्गुरू श्री बसवजय मृत्युंजय महास्वामीजींचे लाभले होते. रॅलीत श्री बसवेश्वर महाराज की जय, पंचमसाली की जय, अशा जयघोषणा दिल्या जात होत्या. …

Read More »

वल्लभगडात सेवानिवृत्त सुभेदार पांडुरंग बोरे यांचे जंगी स्वागत…

  संकेश्वर (महंमद मोमीन) : वल्लभगड गावाचे सुपुत्र सुभेदार पांडुरंग बंडू बोरे हे मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये २८ वर्षांची उत्तम सेवा बजावून सेवानिवृत्त झाले. ते गावाकडे परतले असता वल्लभगड येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. वल्लभगडात आदर्श युवक ढोल ताशा पथकाच्या निनादात सेवानिवृत्त सुभेदार पांडुरंग बोरे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. …

Read More »

निडसोसी मठाचा सोमवारी महादासोह

संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी श्री जगद्गुरू दुरदुंडीश्वर सिध्द संस्थान मठाचा महादासोह सोहळा येत्या सोमवार दि. ५ सप्टेंबर २०२२ रोजी होत आहे. निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात दासोह निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि ४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता नणदीचे …

Read More »

संकेश्वरात बाप्पांचे जल्लोषात स्वागत…

  पारंपारिक वाद्यांचा गजर; फटाक्यांची आतषबाजी घटली.. संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात विघ्नहर्ता श्री गजाननाचे संकेश्वरकरांनी जल्लोषात स्वागत केले. श्री गणेश चतुर्थी दिनी बाप्पांचे सर्वत्र जंगी स्वागत होताना दिसले. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे संकेश्वरातील गणेश भक्तांना बाप्पांचे जंगी स्वागत करता आले नाही. त्यामुळे यंदा गणेश भक्तांत मोठा उत्साह दिसून …

Read More »

अंकले रस्ता येथील चोरीचा तपास लागला; नकली पोलीस ताब्यात

संकेश्वर  (महंमद मोमीन) : संकेश्वर- अंकले रस्ता येथे ३० मे २०२२ रोजी भरदुपारी २.३० वाजता पोलीस असल्याचे भासवून श्रीमती जयलक्ष्मी राजू चौगले यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील सोन्याच्या बांगड्या घेऊन पोबार केलेल्या चोरांना गजाआड करण्यात संकेश्वर पोलिसांना यश मिळाले आहे. याविषयाची पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आलेली माहिती अशी की, संकेश्वर-अंकले रस्ता …

Read More »

हुक्केरीच्या आखाड्यासाठी मातब्बरांच्या नावाची चर्चा…

संकेश्वर (महंमद मोमीन) : कर्नाटक विधानसभेची निवडणूक सात-आठ महिन्यांत होत असल्याने आतापासूनच अनेक मातब्बर नेते तयारीला लागलेले दिसताहेत. हुक्केरी विधानसभा निवडणुकीत मंत्री उमेश कत्तीं विरोधात काॅंग्रेसचे माजी मंत्री ए. बी. पाटील लढत देणार असल्याची चर्चा सुरु असताना आता यमकनमर्डीचे आमदार कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांचे नाव देखील …

Read More »

शिवनंदा संघाने कला संस्कृती जपली : गुरुदेव हुलेपण्णावरमठ

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील शिवनंदा कला साहित्य आणि सांस्कृतिक संघाने ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य केल्याचे सेवानिवृत्त प्राध्यापक गुरुदेव हुलेपण्णावरमठ यांनी सांगितले. संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर सभा मंडप येथे आयोजित कर्नाटक सांस्कृतिक महोत्सवात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शिवनंदा कला साहित्य आणि सांस्कृतिक संघातर्फे महोत्सवाचे …

Read More »

संकेश्वरात सोयाबीनचा “भाव” घसरला…

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर भागात नविन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळालेले दिसत आहे. संकेश्वर-गडहिंग्लज रस्ता येथील श्री शंकरलिंग ट्रेडर्सचे मालक आकाश खाडे यांनी सोयाबीन पूजनांने नविन सोयाबीन खरेदीचा शुभारंभ केलेला दिसत आहे. संकेश्वरातील शेतकरी अनिल रजपूत यांनी प्रथम सोयाबीन विक्रीचा मान …

Read More »

निलगारचे शुक्रवारी दर्शन : शिवपूत्र हेद्दुरशेट्टी

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीचे दर्शन शुक्रवार दि. २ सप्टेंबर २०२२ पासून सुरू केले जाणार असल्याचे निलगार गणपतीचे प्रमुख शिवपुत्र हेद्दुरशेट्टी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे भक्तगणांना निलगार गणपतीचे दर्शन घेता आलेले नाही. त्यामुळे यंदा गर्दी होण्याची शक्यता …

Read More »