Wednesday , April 22 2026
Breaking News

पिपल्स को-ऑप. सोसायटी प्रगतीपथावर : शहनाज गडेकाई

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : पिपल्स मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी अल्पावधीत प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा शहनाज गडेकाई यांनी सांगितले. त्या संस्थेच्या ८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी बोलत होत्या. प्रारंभी दिवंगत मंत्री उमेश कत्ती आणि दिवंगत महनिय व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थितांचे स्वागत आणि अहवाल वाचन शामलिंग हालट्टी (सीईओ) यांनी केले. शहनाज गडेकाई पुढे म्हणाल्या, आमच्या पिपल्स संस्थेला चालू आर्थिक वर्षात ६ लाख २७ हजार २८० रुपये नफा झाला असून यंदा सभासदांना १०% लाभांश दिले जाणार आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल १६ कोटी ५० लाख १४ हजार रुपये असून कर्जाची परतफेड ९०% इतकी झाली आहे. संस्था विकसित करण्याचे काम सभासदांनी करायला हवे आहे. संस्थेकडून कर्ज घेतलेल्या सभासदांनी कर्जाच सदुपयोग करून घेणेबरोबर वेळेत कर्जाची परतफेड करायला हवी आहे.
सभासदत्व रद्द होणार….
सहकर क्षेत्रात सभासदांना कांहीं नियमांचे पालन करावे लागणार आहे. सभासदांनी आपल्या संस्थेशी आर्थिक व्यवहार करणे बंधनकारक राहणार आहे. सभासदांनी आपल्या संस्थेत बचत खाते उघडण्याबरोबर ठेव ठेवणे, कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे कार्य करायला हवे आहे. संस्थेशी आर्थिक व्यवहार न करणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले जाणार असल्याची माहिती शहनाज गडेकाई यांनी दिली. सभेला संस्थापक पवन कणगली, उपाध्यक्ष चिदानंद इंडी, संचालक सुमलता कणगली, आनंद हालदेवरमठ, सुर्यकांत खाडे, सचिन सपाटे, ॲड. शितल चोरगे, कपिल कोळेकर, शिवगौडा पाटील, सुरेश नाईक, सागर गोंधळी, विलास हिरेमनी, सभासद राजू मुंजण्णावर, महंमद मोमीन, प्रदीप कुरबेट अन्य सभासद उपस्थित होते. आभार शाम हालट्टी यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वरातील बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ३० वर्षे कारावास; १ लाख रुपये दंड

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शंकर नगर येथील आरोपी दर्शन भगवंत हुणश्याळी (वय २३) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *