Saturday , April 18 2026
Breaking News

निलगार गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या… भावपूर्ण निरोपाने विसर्जन

Spread the love

 


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीचे सोमवार दि. १९ रोजी रात्री १.१० वाजता हिरण्यकेशी नदीत निलगार गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या, असा भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले. निलगार गणपतीची विसर्जन मिरवणूक फटाक्यांच्या तुफान आतषबाजीत तासभर चाललेली दिसली.

परंपरागत पद्धतीने विसर्जन..
संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीचे परंपरागत पद्धतीने विसर्जन करण्यात आले. हेद्दुशेट्टी कुटुंबियांनी निलगारची परंपरा कायम केलेली पहावयास मिळाली. सोमवार दि. १९ रोजी रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत निलगार गणपती बाप्पांपुढे संकेश्वरातील संसुध्दी गल्ली दत्त भजनी मंडळाने भजनाचा कार्यक्रम सादर केला. तदनंतर हेद्दुरशेट्टी परिवारातील सदस्यांनी गणपतीची पूजा केली. आरती झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. हेद्दुरशेट्टी यांच्या निवासस्थानापासून मारुती मंदिरापर्यंत निलगार गणपती बाप्पा अप्पासाहेब कुंभार यांच्या डोक्यावर विराजमान झालेले दिसले. मारुती मंदिर ते संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठापर्यंत निलगार गणपतीची मूर्ती अभिजित कुरणकर यांच्या जीपमध्ये बसवून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांचा नवस बोललेल्या भक्तांनी तुफान फटाक्यांची आतषबाजी केली. फटाक्यांची तुफान आताषबाजी आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..च्या जयघोषणांनी सारा आसमंत दणाणून गेलेला दिसला. विसर्जन मिरवणुकीत शिवपूत्र हेद्दुरशेट्टी, वीरभद्र हेद्दुरशेट्टी, हनुमंत हेद्दुरशेट्टी, विश्वनाथ, विनोद, महादेव, रजत, प्रशांत हेद्दुरशेट्टी आणि भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्री शंकराचार्य संस्थान मठातून निलगार गणेश मूर्ती विसर्जनाला घेऊन जाण्याची प्रथा आहे. त्यानुसार अप्पासाहेब कुंभार यांच्या डोक्यावर निलगार गणपती बाप्पांना विराजमान करुन मठातून हिरण्यकेशी नदी घाटावर श्रीमूर्ती नेण्यात आली. नदी घाटावर आरती झाल्यानंतर निलगार गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या..असा भावपूर्ण निरोप देत निलगार गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वरातील बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ३० वर्षे कारावास; १ लाख रुपये दंड

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शंकर नगर येथील आरोपी दर्शन भगवंत हुणश्याळी (वय २३) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *