Thursday , September 19 2024
Breaking News

संकेश्वर

योगगुरू बसवराज नागराळे यांच्या सन्मानाने गुरुपौर्णिमा साजरी

संकेश्वर (महंमद मोमीन) : ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्राचे योगशिक्षक बसवराज नागराळे यांच्या सन्मानाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षक पी. डी. पाटील यांनी भूषविले होते. प्रारंभी शिक्षिका श्रीमती लिना कोळी, श्रीमती कुंभार यांनी प्रार्थना गीत सादर केले. योगसाधक म्हणाले, योगगुरू बसवराज नांगराळे यांच्यामुळे आपणा सर्वांना उत्तम आरोग्याची …

Read More »

संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे गुरुपौर्णिमा साजरी.

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने येथील श्री महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये उत्साही वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. संकेश्वरतील प्रसिद्ध पुरोहित वामन पुराणिक यांना शाल, श्रीफळ व गौरव चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना वामन पुराणिक म्हणाले आपल्या गुरुजनांविषयी नेहमीच आदरभाव ठेवा. …

Read More »

संकेश्वरात उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धेला उदंड प्रतिसाद

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर बेंदूर कमिटीतर्फे खास बेंदूरनिमित्य आयोजित हुक्केरी तालुका स्तरीय आणि संकेश्वर शहर स्तरीय बैलजोडी उत्कृष्ट स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. बळीराजा आपल्या पोशिंदा बैलांचा बैलपोळा सण पावसाची पर्वा न करता अमाप उत्साही वातावरणात साजरा करताना दिसला. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या उत्कृष्ट बैलजोडींची गावातील प्रमुख मार्गे सवाद्य मिरवणूक …

Read More »

शिक्षणाला परिश्रमाची जोड हवी : श्री अदृश्य काडसिध्देश्वर महास्वामीजी

संकेश्वर (महंमद मोमीन) : शिक्षणाला परिश्रमाची जोड हवी असल्याचे कणेरी मठाचे परमपूज्य श्री अदृष्य काडसिध्देश्वर महास्वामीजींनी सांगितले. संकेश्वर येथील एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित एस.एस.के. पाटील इंग्रजी माध्यम शाळेच्या नूतन वास्तू उद्घाटन सोहळ्यात सहभागी होऊन श्रींनी शिक्षण कसे असायला हवे असल्याचे सांगितले. प्रारंभी शाळेय मुलींनी शानदार नृत्य सादर केले. उपस्थितांचे स्वागत …

Read More »

संकेश्वरात बकरी ईद उत्साहात साजरी

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज मुस्लिम बांधवांनी ईद-उल-अजहा (बकरी ईद) अमाप उत्साहात साजरी केली. तरणा पाऊस संततधार बरसत असल्यामुळे मुस्लिम बांधवांना ईदची नमाज ईदगाह ऐवजी मशीदमध्ये पठण करावी लागली. सुन्नत जमातने ईदची नमाज सकाळी सात वाजता तर मोमीन (मेहदी) समाज बांधवांनी ईदची नमाज सकाळी ८.३० वाजता पठन केली. नमाज …

Read More »

संकेश्वरात आषाढी एकादशी भक्तीमय वातावरणात साजरी

संकेश्वर (महंमद मोमीन) :  संकेश्वरात आज देवशयनी आषाढी एकादशी भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. येथील गांधी चौक विठ्ठल-रखुमाई मंदिर आणि गोंधळी गल्लीतील श्री विठ्ठल मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी भक्तगणांनी मोठी गर्दी केलेली दिसली. भक्तगण रांगेत उभे राहून विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेवून पुनित होताना दिसले. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव …

Read More »

दोस्ताने ब्लेडने दोस्तांचा गळा चिरला

चिल्लर पैशांच्या व्यवहारातून प्राणघातक हल्ला संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज शुक्रवार दि. ८ रोजी दुपारी १२ वाजता वडर गल्लीत दोस्तांने ब्लेडने दोघा दोस्तांचा गळा चिरल्याची घटना घडली आहे. ब्लेडने गळा चिरल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ बेळगांव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे …

Read More »

काय शाळा, काय ग्राऊंड….

संकेश्वर (प्रतिनिधी) : अंकले तालुका हुक्केरी येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड-मराठी शाळेची दुरावस्था झालेली दिसत आहे. शाळेतील गळक्या वर्गात विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेच्या छतावरील बरीच कौले फुटल्याने पावसाचे पाणी थेट शाळेत प्रवेश करु लागले आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षक ठिक-ठिकाणी बादल्या ठेवून त्यावर कसाबसा तोडगा काढण्याचा …

Read More »

खनदाळ येथे आषाढीला श्रीसंत सद्गुरू बाळूमामा धार्मिक उत्सव

संकेश्वर (महंमद मोमीन) : खनदाळ तालुका गडहिंग्लज येथील श्रीसंत सद्गुरू बाळूमामा मंदिरात आषाढीला विविध धार्मिक कार्यक्रमांंचै आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थान विश्वस्त कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. येत्या रविवारी १० जुलै २०२२ रोजी आषाढी एकादशीला निलजी ते खनदाळ श्रीसंत सद्गुरू बाळूमामा मंदिरापर्यंत दिंडी सोहळा संपन्न होणार आहे. सायंकाळी प्रवचन, पूजा, …

Read More »

बकरी ईद शांततेने पार पाडा : प्रल्हाद चन्नगिरी

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर परिसरातील तमाम मुस्लिम बांधवांनी ईद-उल-अजहा बकरी ईद परंपरागत पद्धतीने शांततेने पार पाडण्याचे आवाहन संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांनी केले. संकेश्वर पोलिस ठाण्यावर आयोजित ईदच्या शांतता सभेत त्यांनी मुस्लिम बांधवांना ईद विषयी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले ईद साजरी करताना मुस्लिम बांधवांनी शांततेच्या …

Read More »