Sunday , July 26 2026
Breaking News

गोकाक पोलिसांकडून मंगळसूत्र चोरीचा तपास; दोघांना अटक

Spread the love

मंगळसूत्र, दोन दुचाकी अंदाजे किंमत 3 लाख 55 हजार रुपये जप्त
संकेश्वर (महंमद मोमीन) : गोकाक गावात गेल्या महिनाभरापासून झालेल्या चोरीचा तपास लावण्यात गोकाक पोलिसांना यश मिळाले आहे. गोकाक पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाल आर. राठोड यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून दोघा चोरांना गजाआड करुन ५० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, दोन दुचाकी अदमासे किंमत 3 लाख 55 हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, बेळगांव जिल्हा पोलिस प्रमुख संजय पाटील, सहाय्यक पोलीस प्रमुख महानिंग नंदगांवी, गोकाक डीएसपी मनोजकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गोकाक पोलीस निरीक्षक गोपाल आर. राठोड यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून सोमवार दि. २५ रोजी सकाळी ६.१५ वाजता गोकाक-योगीकोळ्ळ रस्त्यावर मोटारसायकलवरून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आले. अटक केलेल्या संशयितांची कसून चौकशी केली असता दोघे अट्टल चोरटे निघाले आहेत. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी गोकाक येथे सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याचे कबूल केले असून चोरीसाठी दुचाकी देखील चोरीचीच वापरल्याचे कबूल केले आहे. चोरांकडून ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन मोटारसायकली अदमासे किंमत 3 लाख 55 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. चोरांना गजाआड करण्याचे कार्य गोकाक पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एम.डी. घोरी, ए. एस.आय. रमेश हडपद, गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस कर्मचारी बी.व्ही. नेरली, सुरेश इरगार, मलप्पा गिडगिरी, सचिन होळेप्पगोळ, विठ्ठल नाईक, रमेश मुरनाळी यांनी शिताफीने करुन दाखविले आहे.गोकाक पोलिस ठाण्यात चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *