Sunday , September 20 2026
Breaking News

संकेश्वरात पोलीस अधिकारी रवि चन्नण्णावर यांचा वाढदिवस नोटबूक वाटपाने साजरा

Spread the love

 


संकेश्वर (महंमद मोमीन) : बेंगळूरचे वरीष्ठ पोलिस अधिकारी (आय पी.एस.) रवि डी. चन्नण्णावर यांचा वाढदिवस संकेश्वरातील त्यांचे अभिमानी गिरीश निडसोसी यांनी सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ५०० नोटबूक वितरणांने उत्साही वातावरणात साजरा केला. वह्या वाटप कार्यक्रमाविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना गिरीश निडसोसी म्हणाले, आमचे लाडके वरीष्ठ पोलिस अधिकारी रवि डी. चन्नण्णावर यांच्या सामाजिक कार्याने आपण प्रभावित झालेले आहोत. ते एक दक्ष पोलीस अधिकारी असून त्यांच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. पोलिस अधिकारी रवि डी. चन्नण्णावर यांचा वाढदिवस सर्वार्थाने समाजोपयोगी ठरावा याकरिता आपण रवि डी. चन्नण्णावर अभिमानी बळगच्या वतीने सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पाचशे नोटबूक वितरण केले आहे.

यावेळी गिरीश यांच्यासमवेत प्रितम गंडापगोळ, विश्वनाथ सुतार, राजेश पुजारी, सूरज पोतदार उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक तळवार सर यांनी विद्यार्थ्यांना पोलिस अधिकारी रवि चन्नण्णावर यांच्या कार्याचा परिचय करून दिला. ते म्हणाले, रवि चन्नण्णावर यांनी अतिशय कष्टातून शिक्षण घेऊन आयपीएस अधिकारी बनले आहेत. कर्नाटकात त्यांच्या कार्याचा नावलौकिक राहिला आहे. युवा वर्गाने त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *