Thursday , September 19 2024
Breaking News

संकेश्वर

रमेश जारकहोळी यांच्याकडून नष्टी परिवाराचे सांत्वन

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरचे धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांच्या अकाली निधनाने एक समाजसेवक हरपल्याचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले. त्यांनी नष्टी यांच्या निवासस्थानी भेट देऊन नष्टी परिवाराचे सांत्वन केले. ते म्हणाले दिवंगत संजय नष्टी हे समाजासाठी, संकेश्वरच्या विकासासाठी झटणारे नगरसेवक होते. संकेश्वरच्या लिंगायत रुद्रभूमीकरिता जागा हवी असल्याचे ते नेहमी …

Read More »

संकेश्वरात पतंजली योग समितीतर्फे रामनवमी साजरी

संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील श्री महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे रामनवमी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. संकेश्वरचे पोरोहित वामन पुराणिक, योगशिक्षक पुष्पराज माने यांनी श्रीराम प्रतिमेचे पूजन केले. उपस्थितांचे स्वागत योगशिक्षक परशुराम कुरबेट यांनी केले यावेळी वामन पुरानिक, सुरेखा शेंडगे, विजयालक्ष्मी भागवत यांनी श्रीराम नवमीचे महत्व समजावून सांगितले. …

Read More »

संकेश्वरात मटण झाले स्वस्त….

संकेश्वर (प्रतिनिधी) : आजच्या महागाईच्या जमान्यात जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी होण्याची शक्यता कोठेच दिसेनासी झालेली असताना संकेश्वरातील मटण विक्रेत्यांनी प्रतिकिलो मटणचा दर शंभर रुपयांनी कमी करुन मासांहारी लोकांना दिलासा मिळवून देण्याचे कार्य केलेले दिसताहे. येत्या मंगळवार दि. 12 एप्रिल 2022 पासून संकेश्वरात मटण प्रतिकिलोचा दर 500 रुपये राहणार आहे. त्यामुळे …

Read More »

संकेश्वर काँग्रेसतर्फे गुहमंत्र्यांचे उच्चाटन करण्याचे निवेदन

सी. टी. रवि यांना अटक करण्याची मागणी संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी यांच्या नेतृत्वाखाली आज पोलिस ठाण्यावर मोर्चाने जाऊन पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांना राज्याचे गृहमंत्री आणि सी. टी. रवि यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनातून राज्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांना मंत्रीपदावरुन उच्चाटन आणि …

Read More »

कणगला श्री रेणुकादेवी मंदिरात २.५ लाख रुपयांची चोरी

देवीचा चांदीचा मुखवटा पादुका, अलंकाराची चोरी संकेश्वर (प्रतिनिधी) : कणगला श्री रेणुकादेवी मंदिरात गुरुवारी मध्यरात्री मंदिराचा शटरचा कडीकोंयडा तोडून चोरांनी देवीचा चांदीचा मुखवटा, पादुका, छत्री देवीचे सोन्याचे अलंकार अदमासे किंमत २.५ लाख रुपयांची चोरी करुन पोबारा केला आहे. चोरीच्या घटनेची समजलेली माहिती अशी, कणगला श्री रेणुकादेवी मंदिरात गुरुवारी मध्यरात्री चोरांनी …

Read More »

सरकारी दवाखान्याला आता “नो इर्मजन्सी”

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर शासकीय रुग्णालयाला जाण्याचा मार्ग खडतर बनला आहे. या मार्गावरुन रुग्णवाहिका जाऊ शकत नाही. रुग्णवाहिकेला शासकीय रुग्णालयाला जाण्यासाठी संकेश्वर बसस्टॅंड, निडसोसी कमान, निडसोसी रस्ता, अंकले रस्ता ते शासकीय रुग्णालय असा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे रुग्णांचे चांगलेच हाल होताना दिसत आहेत. रुग्णाची परिस्थिती नाजूक असेल तर “नो …

Read More »

संकेश्वरातून ईटीची हकालपट्टी करा : राजू बांबरे

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील लोक विकास कामाच्या आणि स्वच्छतेच्या नावाने शिमगा करताहेत. याला मुख्याधिकारी जगदीश ईटी हेच कारणीभूत ठरल्याने त्यांच्या हकालपट्टी करायला हवी असल्याचे माजी नगरसेवक राजू बांबरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, मुख्याधिकारी जगदीश ईटी यांच्या कामाची पध्दत एक काम बारा महिने थांब असल्यामुळे गावात विकास कामे …

Read More »

संकेश्वरी मिर्ची लय भारी….

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरी मिर्चीने आपला ठसका आणि झणझणीतपणा कायम राखत यंदा देखील संकेश्वरी मिर्चीने दरात नंबर वन कायम केलेले दिसताहे‌. त्यामुळे बाजारात संकेश्वरी मिर्ची लय भारी ठरली आहे. तीन दशकापूर्वी संकेश्वरी मिर्चीने अख्खी मुंबई बाजारपेठ काबीज केल्याचे आजही सांगितले जात आहे. त्यावेळी संकेश्वर राणी चन्नम्मा मार्केट यार्डमध्ये संकेश्वरी …

Read More »

संकेश्वरात लिंबूच्या दरात वाढ!

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर बाजारात कागदी लिंबूला लोकांत मोठी मागणी दिसताहे. उन्हाचा चढता पारा लिंबू दरात वाढ करणारा ठरला आहे. बाजारात लिंबूची आवक घटली असून दरवाढ झालेली दिसत आहे. संकेश्वरात यंदा लिंबू दरांने उच्चांक गाठला असून कागदी लिंबूचा दर शेकडा ५०० ते १२०० रुपये झाला आहे. किरकोळ लिंबू विक्री दहा-बारा …

Read More »

संकेश्वरात श्री कालिकादेवी जात्रामहोत्सव

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री कालिकादेवी देवस्थान जिर्णोध्दार ट्रस्ट कमिटीतर्फे श्री कालिकादेवी यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. आज चैत्र पंचमीला सकाळी देवीला महाभिषेक करण्यात आला. महामंगल आरती झाले नंतर गावातील प्रमुख मार्गे श्री कालिकादेवीचा पालखी उत्सव काढण्यात आला. यामध्ये रामबाग, अँथनी येथील मोहनेश आचार्य समुहाने परंपरागत …

Read More »