Sunday , July 26 2026
Breaking News

संकेश्वरात भगवान श्री पार्श्वनाथ मदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी…..

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील पार्श्वलब्दीपूरम येथील नूतन सांख्येश्वर पार्श्वनाथ मंदिरावर आज सकाळी सकाळी 11.30 वाजता हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. मंदिरावर हेलिकॉप्टरने होणारी पुष्पवृष्टी पहाण्यासाठी संकेश्वर परिसरातील मुले-मुली युवक-युवती आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालत पुष्पवृष्टी करणारे दृश्य अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेर्‍यातून टिपून घेतले. पादगुडी, नमाजमाळ, उपाध्ये चाळ, अनंतविद्यानगर येथील अबालवृद्ध घराबाहेर थांबून हेलिकॉप्टर जवळून पाहण्याचा आनंद लुटताना दिसले. आचार्य श्री सांख्येश्वरप्रेमी महासेनसुरीश्वरजी महाराज यांच्या हस्ते नूतन पार्श्वनाथ मंदिरात भगवान श्री पार्श्वनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.


धर्मसभेत बोलताना आचार्य सांख्येश्वरप्रेमी महासेनसुरीश्वरजी महाराज म्हणाले धर्माचे काटेकोरपणाने पालन करा. देवावर श्रध्दा ठेवा. गेली आठ दिवस चाललेल्या येथील धार्मिक कार्यक्रमांत तुम्हा सर्वांचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. आपली देवावरील श्रध्दा आपणाला नेहमी चांगले कार्य करण्यास प्रवृत्त करणारी ठरणार असल्याचे स्वामीजींनी सांगितले. आठवडाभर चाललेल्या कार्यक्रमात सहकार्य केलेल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करण्यात आले. मंदिर उद्घाटन सोहळ्यात पार्श्वलब्दी शासनसेवा ट्रस्टचे पदाधिकारी सदस्य, तसेच श्रावक-श्रावकी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भगवान श्री पार्श्वनाथ मंदीर उद्घाटन व प्रभू प्रतिष्ठापना कार्यक्रम साखेश्वरप्रेमी श्री महासेनसुरीश्वरजी महाराज साहेब व श्री विक्रमसेन श्री सिद्धसेन श्री जिनसेन महाराज साहेब व पुण्यवर्धमान तपोनिधी साध्वी ऋचाप्रज्ञाजी याच्या नेत्रुत्वाखाली व मार्गदर्शनाखाली पार पडले. कार्यक्रमाला कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आदी रज्यातून श्रावक, श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उद्या शुक्रवार दि. 22 एप्रिल 2022 रोजी श्री पार्श्वनाथ मंदिर उघडून पूजाअर्चा कार्यक्रमाच्या शुभारंभाने गेली 9 दिवस चाललेल्या कार्यक्रमाची सांगता केली जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *