Sunday , July 26 2026
Breaking News

संकेश्वर औषध संघटनेचे कार्य स्तुत्य : रमेश कत्ती

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर औषध व्यापारी संघटनेने हुक्केरी येथील मोफत आरोग्य तपासणी शिबिराला मोफत औषधे देऊन शिबिराला हातभर लावण्याचे कार्य केले आहे. संकेश्वर औषध संघटनेचे कार्य स्तुत्य असल्याचे बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितले. हुक्केरी शासकीय रुग्णालयातर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात संकेश्वर औषध संघटनेच्या औषधांचा स्विकार करुन त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हुक्केरी शासकीय रुग्णालयातर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांना तपासणीनंतर मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. संकेश्वर औषध व्यापारी संघटनेतर्फे बीपी शुगर टॅबलेट, सिरप, तसेच अन्य उपयुक्त टॅबलेटचे तीन बाॅक्स देण्यात आले.

यावेळी हुक्केरी तालुका वैद्याधिकारी डॉ. उदय कुडची, डॉ. नरसण्णावर, संकेश्वर औषध संघटनेचे अध्यक्ष मल्लीकार्जुन पट्टणशेट्टी, जयप्रकाश सावंत, किरण किंवडा उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *