खानापूर : कर्नाटक सरकारच्या महत्त्वकांक्षी योजना असलेल्या पाच गॅरंटी योजनाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने कमिट्यांची रचना केली आहे. जिल्हास्तरीय तालुकास्तरीय सरकारी नियुक्त कमिट्या करण्यात आल्या असून खानापूर तालुका गॅरेंटी योजना अनुष्ठान समितीच्या अध्यक्षपदी माडीगुंजीचे काँग्रेस कार्यकर्ते सूर्यकांत कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी मंजुनाथ आळवणी यांच्यासह 15 …
Read More »पूरग्रस्तांनी घाबरून जाऊ नये : प्रियंका जारकीहोळी
पूरग्रस्त गावांना दिल्या भेटी निपाणी (वार्ता) : आठवडाभर पडणाऱ्याया पावसामुळे निपाणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी निपाणी मतदारसंघातील पूरग्रस्त गावांना भेटी देऊन प्रशासनाने सर्वतोपरी यंत्रणा साजरी केली असून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन खासदार प्रियांका जायकीहोळी यांनी केले. निपाणी मतदारसंघातील …
Read More »शेतकऱ्यांच्या न्यायासाठी देशव्यापी आंदोलन
राजू पोवार; पुणे येथे निर्धार मेळावा निपाणी (वार्ता) : देशाला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्याला अन्नदाता म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. पण शेतीमालाला योग्य भाव देण्यास देशातील सरकार असमर्थ ठरले आहे. या उलट खते, बी- बियाण्याचे दर वाढविले आहेत. भाजीपाल्यालाही योग्य दर दिला जात नाही. अतिवृष्टी, महापूर काळात केवळ सर्वे करून शेतकऱ्यांच्या …
Read More »पूर पाहण्यासाठी सदलगा शहरातील दूधगंगा नदी आणि दत्तवाड पुलावर लोकांनी केली गर्दी
महापूर पाहण्यास येणाऱ्या सर्व जनतेला प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा चिक्कोडी : सदलगा शहराजवळून वाहणाऱ्या दूधगंगा नदीला आता खूपच मोठा महापूर आल्याने सदलगा शहरातील अनेक स्त्रिया, लहान थोर मंडळी, पुरुष, तरुण वर्ग मोठ्या संख्येने व गटागटाने दूधगंगा नदी किनारी फार मोठी गर्दी करून महापूर पाहण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जात आहेत. त्याचबरोबर दत्तवाड …
Read More »तालुका महाराष्ट्र एकीकरण व युवा समिती निपाणी यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप
निपाणी : तालुका महाराष्ट्र एकीकरण व युवा समिती निपाणी यांच्या वतीने निपाणीतील ग्रामीण भागातील मराठी शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कुर्ली व सौंदलगा येथे उच्च प्राथमिक मराठी शाळांमध्ये वाटप केले. मराठी शाळा व भाषा वाचविण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना मराठी मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी …
Read More »वाल्मिकी घोटाळ्यातील मुख्य आरोपीच्या घरात सापडले १० किलो सोने
बंगळूर : वाल्मिकी विकास महामंडळाचे कोट्यवधी रुपयाच्या घोटाळ्याचा तपास तीव्र करणाऱ्या सीआयडी आणि एसआयटीच्या तपास पथकाने मुख्य आरोपी सत्यनारायण वर्माच्या घरात लपवून ठेवलेली १० किलो सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. तसेच हैदराबाद येथील फ्लॅटमध्ये ८ कोटी रुपये जप्त केले आहेत. वाल्मिकी घोटाळ्याच्या पैशाने सोने खरेदी केल्याचे उघडकीस आल्यानंतर आरोपी …
Read More »पीओपी मूर्तींना आळा घालण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना
एकेरी वापराच्या प्लास्टिकवरही निर्बंध बंगळूर : एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यभर मार्शलचा समावेश असलेले टास्क फोर्स स्थापन केले जाईल. यावर्षी गणेश चतुर्थी दरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींचा वापर केला जाणार नाही याची खात्री करण्यासाठी देखील टास्क फोर्स कठोरपणे काम करेल, वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर …
Read More »मणतुर्गा येथे घर कोसळून नुकसान
खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गे गावातील प्रकाश रावबा देवकरी, सूर्याजी गणपती देवकरी, हणमंत देवकरी यांच्या राहत्या घराची भिंत अतिवृष्टीमुळे कोसळली असून ती घराशेजारी असलेल्या श्री नागेश देव मंदिरावर पडली. त्यामुळे मंदिराचे देखील नुकसान झाले आहे. दुपारच्या वेळी देवकरी कुटुंबीय कामानिमित्त घराबाहेर गेलेले असताना भिंत कोसळली, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी …
Read More »राष्ट्रीय महामार्गावरील दुहेरी वाहतूक सुरु; यमगर्णी येथे जोडला रस्ता
निपाणी (वार्ता) : सलग चार दिवस होणाऱ्या पावसामुळे पुणे- बंगळुर राष्ट्रीय महामार्गावरील मांगुर फाट्याजवळ सेवा रस्ता आणि शेतीवाडीतील पाणी आल्याने विस्कळीत झाली होती. तर शुक्रवारी (ता.२६) एकेरी वाहतूक सुरू होती. शनिवारी (ता.२७) पहाटेपासूनच पाऊस थांबण्यासह पाणी वाहून गेले. तसेच यमगर्णी येथे महामार्ग रस्ता जोडल्याने दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे. …
Read More »निपाणीचा जवाहर तलाव ओव्हर फ्लो
नगरपालिकेने सोडला सुटकेचा निःश्वास निपाणी (वार्ता) : निपाणीची जीवनदायिनी असणारा जवाहर तलाव आठवडाभराच्या मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरला. यंदा सुरुवातीपासूनच शहर आणि परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे तलाव भरून पाणी तलावाबाहेर पश्चिमेकडील बाजूने बाहेर पडले. त्यामुळे वर्षभराचा पाणी प्रश्न निकालात निघाला असून नगरपालिका प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta