Tuesday , November 24 2026
Breaking News

कर्नाटक

गावोगावी फुलताहेत भक्तीची मळे

  ऐन‌ उन्हात आदमापूर, आडी दत्त देवस्थानकडे भक्तांची पाऊले निपाणी‌ (वार्ता) : सध्याच्या युगात प्रत्येकजण कामाच्या मागे धावत आहे. त्यामुळे मनशांती मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ मन शांतीसाठी गावोगावातील विविध धार्मिक मंडळे आदमापूर, मेतके येथील सद्गुरु बाळूमामा, श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी आणि आडी येथील दत्त देवस्थानला भेट देण्यासाठी पायी दिंडी …

Read More »

राज्यात प्रति युनिट ५६ पैसे वीजदर वाढ; मेपासून नवे दर लागू

  बंगळूर : उन्हाच्या तीव्र लाटेमुळे आधीच त्रस्त असलेल्या राज्यातील नागरिकांना आता वीजदरवाढीचा धक्का बसला आहे. कर्नाटक वीज नियामक आयोगाने (केईआरसी) वीजदरात वाढ करण्याचा अधिकृत आदेश जारी केला असून, सर्व एस्कॉम (एस्कॉम) ग्राहकांना प्रति युनिट ५६ पैशांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. केईआरसीच्या आदेशानुसार, ही दरवाढ २०२४-२५ या आर्थिक …

Read More »

योगेश गौडा खून प्रकरण: माजी मंत्री विनय कुलकर्णीसह १६ जणांना जन्मठेप

  बंगळूर : धारवाड येथील भाजप नेते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात माजी मंत्री आणि विद्यमान काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांच्यासह १६ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. बंगळुर येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने आज हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणात पुरावे लपवून आरोपींना मदत केल्याबद्दल एका पोलीस अधिकाऱ्यालाही सात वर्षांच्या साध्या …

Read More »

म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या कु. सबीना लुईस लोबो हिचा गौरव

  खानापूर : खानापूर तालुक्यातच नव्हे तर बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण कर्नाटक राज्यात आपल्या अव्वल गुणवत्तेने ठसा उमटवणाऱ्या म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या कु. सबीना लुईस लोबो हिच्या यशाचा गौरव करण्यासाठी मलेशिया स्थित ॲटलांटा कार समूहाचे निष्णात डायरेक्टर श्री. परशराम कोलेकर यांनी रोख रुपये अकरा हजारांचा धनादेश सुपूर्द करून तिच्या कर्तृत्वाला …

Read More »

ममदापूर (के. एल.) अंबिकादेवी यात्रेनिमित्त पाच दिवस विविध कार्यक्रमासह शर्यतींचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांनी स्थापन केलेल्या प्रति तुळजापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ममदापूर ( के. एल.) येथील अंबिका देवीची यात्रा रविवार (ता.१९) ते गुरुवार (ता.२३) अखेर होणार आहे. निमित्त पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमासह शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजन कमिटीने दिली आहे. रविवारी …

Read More »

खासगी बस आणि कारची समोरासमोर धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू

  यादगीर :  खासगी बस आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. कर्नाटकच्या यादगिरी जिल्ह्यात शुक्रवारी ही घटना घडली. धडक बसल्यानंतर कारने पेट घेतला. या आगीत कारमधील सहा जण होरपळले. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, कार यादगिरीहून रायचूरच्या दिशेने जात होती, तर बस बंगळुरूवरून कलबुर्गीकडे चालली होती. …

Read More »

योगेश गौडा खून प्रकरण: विनय कुलकर्णींसह १६ दोषीना आज शिक्षा होणार जाहीर

  बंगळूर : २०१६ मध्ये घडलेल्या भाजप नेते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांच्यासह इतर १६ आरोपींना दोषी ठरवले असून, शिक्षेची मात्रा उद्या (ता. १७) जाहीर करण्यात येणार आहे. आज न्यायालयात शिक्षेच्या प्रमाणाबाबत सरकारी पक्ष व बचाव पक्ष यांचे युक्तिवाद ऐकून घेण्यात आले. …

Read More »

मंत्रालयाजवळ भीषण अपघात; कर्नाटकातील ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

  बंगळूर : आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील मंत्रालयाजवळ गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात कर्नाटकातील ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. चिलकलडोना गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६७ वर हा अपघात घडला. माहितीनुसार, चिक्कमगळूरहून मंत्रालय येथे राघवेंद्र स्वामींच्या दर्शनासाठी निघालेल्या अशोक लेलँड या मालवाहू वाहनाची आणि बीदरहून तुमकूरकडे जात …

Read More »

घरगुतीतून व्यावसायिक सिलिंडरमध्ये रूपांतर

  शहरात गॅस माफियांचा सुळसुळाट; अपघाताच्या धोक्याची शक्यता निपाणी (वार्ता) : आखाती देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यापासून घरगुती सिलिंडर मिळविण्यासाठी ग्राहकांचा आटापिटा सुरू आहे. त्यासाठी ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येणे आवश्यक असते. तरीही शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार करून त्यांचे व्यावसायिक सिलिंडरमध्ये रूपांतर केले जात असल्याचे समोर येत आहे. ठिकठिकाणी …

Read More »

निपाणीसह परिसरात शिव-बसव जयंती, अक्षय तृतीयेच्या तयारीची लगबग

  निपाणी (वार्ता) : शिव-बसव जयंती आणि अक्षय तृतीयेला केवळ दोन दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. शिव- बसव जयंतीसह अक्षय तृतीया सणाच्या तयारीची शहरासह ग्रामीण भागात लगबग दिसून येत आहे. येथील बाजारपेठेत जयंतीसाठी लागणारे नानाविध आकाराचे भगवे ध्वज आणि त्यावर शिव -बसव प्रतिमा असणारे ध्वज विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. विविध …

Read More »