Tuesday , November 24 2026
Breaking News

संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी बेळगावात ‘भारताचे संविधान’ विषयावर व्याख्यान

Spread the love

 

बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि प्रगतिशील लेखक संघ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाचे औचित्य साधून ‘भारताचे संविधान’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सलोनी शिवराज पाटील या व्याख्यानातून भारतीय संविधानाविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता रामदेव गल्ली येथील गिरीष कॉम्प्लेक्समधील शहीद भगतसिंग सभागृहात (कार पार्किंग) हा कार्यक्रम होणार आहे. प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष प्राचार्य आनंद मेणसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.

या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे उपाध्यक्ष अनिल आजगावकर आणि सचिव कृष्णा शहापूरकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी माध्यम शिक्षक भरती अन्याय : युवा समितीच्या वतीने उद्या मंगळवारी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

Spread the love  बेळगाव : कर्नाटक सरकारने शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली असून, सरकारने मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *