Friday , November 6 2026
Breaking News

ममदापूर (के. एल.) अंबिकादेवी यात्रेनिमित्त पाच दिवस विविध कार्यक्रमासह शर्यतींचे आयोजन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांनी स्थापन केलेल्या प्रति तुळजापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ममदापूर ( के. एल.) येथील अंबिका देवीची यात्रा रविवार (ता.१९) ते गुरुवार (ता.२३) अखेर होणार आहे. निमित्त पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमासह शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजन कमिटीने दिली आहे.
रविवारी (ता.१९) आठ वाजता पालखी मिरवणूक असून पूर्ण दिवस पाळक आहे. यादिवशी यादिवशी तारळे येथील अजिंक्य बॅन्जो पार्टी चा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (ता.२०) ११ वाजता महा अभिषेक, १२ वाजता महाप्रसाद वाटप होणार आहे. रात्री आयोजित रेकॉर्डंस स्पर्धेसाठी ११ हजार रुपये, ९ हजार रुपये ७ हजार रुपये आणि ५ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. मंगळवारी आणि बुधवारी मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत.

गुरुवारी (ता.२३) सकाळी ९ वाजता विविध शर्यती होणार आहेत.’अ ‘गट जनरल बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे १ लाख ११ हजार १११ रुपये, ७५ हजार १ रुपये आणि ५५ हजार १ रुपये, जनरल बैलगाडी ‘ब,’ गट शर्यतीसाठी अनुक्रमे ४१ हजार रुपये ३१ हजार रुपये आणि २१ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. जनरल घोडा गाडी शर्यतीसाठी अनुक्रमे २० हजार रुपये, १५ हजार रुपये आणि १० हजार रुपये, जनरल घोडा- बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे २० हजार रुपये, १५ हजार रुपये १० हजार रुपये, बिन जाती घोडा-बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे १० हजार रुपये, ७ हजार रुपये आणि पाच हजार रुपये, जनरल दुस्सा चौसा बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे २० हजार रुपये, १५ हजार रुपये आणि १० हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. सर्व विजेत्यांना ममदापूर केसरी किताब आणि ढाल निशान देण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

जेलभरो आंदोलनासाठी जाणाऱ्या ‘रयत’च्या कार्यकर्त्यांना निपाणी पोलिसांनी रोखले

Spread the love    निपाणी (वार्ता) : यंदा सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने ऊसासह अन्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *