Sunday , September 20 2026
Breaking News

येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार

Spread the love

येळ्ळूर : येळ्ळूरमधील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्यानंतर संपूर्ण सीमाभागात संतापाची लाट उसळली. मराठी भाषीकांच्या हृदयावर घाव घालून न थांबता कर्नाटकी पोलिसांनी येळ्ळूरच्या निष्पाप जनतेवर वेगवेगळे सात गुन्हे दाखल केले. मात्र न्यायदेवतेने येळ्ळूरवासियांना साथ देवून सर्वांची निर्दोष मुक्तता केली. तब्बल 12 वर्षे हा न्यायालयीन लढा सुरू होता. बचाव पक्षाला न्यायालयाचे हेलपाटे मारावे लागत होते. पण बचावकर्त्यांचे वकील ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. शाम पाटील, ऍड. हेमराज बेंचण्णावर आदि वकील येळ्ळूरवासियांच्या पाठिशी राहून त्यांनी जबरदस्त व्यक्तिवाद केला. त्यामुळेच या सात खटल्यातून जवळपास 250 जणांची निर्दोष मुक्तता झाली. या वकिलांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. शाम पाटील, ऍड. हेमराज बेंचण्णावर आदि वकिलांचा सत्कार येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र कुस्ती मैदानाच्यावतीने दुद्दापा बागेवाडी, प्रकाश अष्टेकर, दत्ता उघाडे, राजू पावले, अजित गोरल, भोला पाखरे, सतीश कुगजी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
सदर न्यायालयीन खटला चालविण्यासाठी माजी जि. पं. सदस्य अर्जुनराव गोरल, शिवाजी कदम, उदय जाधव, सतीश कुगजी, शामल जाधव, कमळा पोटे, रमेश धामणेकर आदिनी महत्वपूर्ण योगदान दिले.
या सत्कारप्रसंगी रमाकांत कोंडुसकर, प्रमोद पाटील, तानाजी हलगेकर, आनंद कुंडेकर, जोतीबा चौगुले, सुरज गोरल, मधु पाटील इतर मान्यवर हजर होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *