Monday , June 1 2026
Breaking News

घरगुतीतून व्यावसायिक सिलिंडरमध्ये रूपांतर

Spread the love

 

शहरात गॅस माफियांचा सुळसुळाट; अपघाताच्या धोक्याची शक्यता

निपाणी (वार्ता) : आखाती देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यापासून घरगुती सिलिंडर मिळविण्यासाठी ग्राहकांचा आटापिटा सुरू आहे. त्यासाठी ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येणे आवश्यक असते. तरीही शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार करून त्यांचे व्यावसायिक सिलिंडरमध्ये रूपांतर केले जात असल्याचे समोर येत आहे.
ठिकठिकाणी असे बेकायदा रूपांतर सुरू असून व्यावसायिकांना हे सिलिंडर २ ते अडीच हजार रुपयांना मिळत असल्याची माहिती आहे. गॅस एजन्सीच्या संमतीशिवाय हा प्रकार कसा शक्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बेकायदा रूपांतर करताना धोक्याची घंटा कायम असून नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. घरगुती विकणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार सुरू आहे. यापूर्वी २१ दिवसांनी पुन्हा सिलिंडरची नोंदणी करता येत होती. अनेक ग्राहक सव्वा ते दीड महिन्यांनी सिलिंडर घेत असल्याने त्या कालावधीत संबंधित एजन्सीतून ग्राहकांच्या नावावर सिलिंडर नोंदवून त्याचा थेट काळाबाजार केला जात होता.
सध्या बदललेल्या परिस्थितीत शहरात २५ दिवसांनी, तर ग्रामीण भागात ४५ दिवसांनी सिलिंडरची नोंदणी करता येते. त्यासाठी ग्राहकांच्या मोबाईलवर ओटीपी येतो. तरीही घरगुती सिलिंडर काळाबाजारात वळवणे किंवा त्यांचे व्यावसायिक सिलिंडरमध्ये बेकायदा रूपांतर करणे सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
——————————————————————–
पुरवठा विभागाने लक्ष देण्याची मागणी
सध्या ओटीपी शिवाय सिलिंडर मिळत नसल्याने काळाबाजार थांबायला हवा होता. प्रत्यक्षात मात्र तो कमी प्रमाणात का होईना, सुरूच आहे. घरगुती सिलिंडर व्यावसायिक सिलिंडरमध्ये रूपांतर गॅसचा काळाबाजार करून व्यावसायिक सिलिंडर जादा दराने विक्री होत असून त्याकडे पुरवठा विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव नाक्यावरील जलवाहिनीला दुरुस्तीनंतरही गळत

Spread the love  शहर विस्तारले पण पाणी प्रश्न सुटेना निपाणी (वार्ता) : निपाणी शहराचा विस्तार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *