Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटकातील खासदारांची संख्या 28 वरुन 42 वर; अमित शहा यांची लोकसभेत माहिती

Spread the love

 

नवी दिल्ली : आजपासून (१६ एप्रिल) संसदेचे विशेष अधिवेशन सुरू झाले असून महिला आरक्षणाच्या दुरूस्तीसह मतदारसंघाची पुर्नरचना, घटनादुरूस्ती आणि केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित विधेयक मांडण्यात आली आहेत.परंतु, मतदारसंघाची पुर्नरचना या विधेयकाच्या माध्यमातून दक्षिण, वायव्य आणि ईशान्येकडील राज्यांवर लोकसभांच्या जागांबाबतीत अन्याय केला जाईल, अशी भीती विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे. याला आता गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत बोलताना उत्तर दिलं आहे.

लोकसभेत बोलताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले, महिला आरक्षणावरून विरोधक संशयाचे वातावरण निर्माण करत आहेत. संविधान संशोधनानंतर दक्षिणेतील खासदारांची संख्या वाढवणार आहे. कर्नाटकातील खासदारांची संख्या 28 वरून 42 होणार आहे. तामिळनाडू खासदारांची संख्या 39 वरुन 59 वर पोहोचणार आहे. तेलंगणाच्या खासदारांची संख्या 17 वरून 26 होणार आहे. आंध्र प्रदेशातील खासदारांची संख्या 25 वरून 38 पर्यंत पोहोचणार आहे. केरळची जागा 20 वरून 30 होणार आहे. दक्षिणेतील एकूण खासदारांची संख्या 129 वरुन 195 पर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे दक्षिणेचे वर्चस्व वाढणार आहे. जनगणना तसेच जातीय जनगणना ही केली जाणार आहे, असेही अमित शहा यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *