वाहतूक वळविली सेवा रस्त्यावरून; खरी कॉर्नर जवळ भुयारी मार्गाची मागणी निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे जोरदारपणे सुरू झाले आहे. सध्या शहराबाहेरील खरी कॉर्नर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून घरे, दुकाने आणि व्यापारी संकुलाचे बांधकाम पाडले जात आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे कोंडी …
Read More »सरपंच चषक मोदगे येथे भव्य बैलगाडा पळवण्याची जंगी शर्यत
दड्डी : सरपंच चषक फौंडेशन, मोदगे, ता. हुक्केरी, जि. बेळगाव येथे भव्य बैलगाडा पळवण्याची जंगी शर्यत शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ ते रविवार २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित केली आहे. तरी हौशी आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी, कर्नाटक बैलगाडा मालकांनी याचा लाभ घ्यावा, ही विनंती. पुढील प्रमाणे बक्षीसे अशी …
Read More »सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षणास वेग देण्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निर्देश
बंगळुरू : राज्यभर सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण सुरू झालं असून, प्रारंभी काही तांत्रिक अडचणींमुळे या कामात विलंब झाला. आता त्या सर्व अडचणी दूर करण्यात आल्या असून, सर्वेक्षणाच्या गतीस चालना द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कृष्णा येथील व्हिडीओ कॉन्फरन्समधून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. १.४३ कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण हे ऑक्टोबर ७ पर्यंत …
Read More »सर्वेक्षण कर्तव्यास उपस्थित न रहाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई : एच. के. पाटील
बंगळूर : कर्नाटक राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण कामात नियुक्त केलेले अधिकारी किंवा कर्मचारी सर्वेक्षण कामाला उपस्थित न राहिल्यास आणि त्यांची कर्तव्ये पार न पाडल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे कायदा, न्याय, मानवाधिकार, संसदीय व्यवहार आणि कायदे आणि पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले. …
Read More »डॉ. आंबेडकर वाचनालय हस्तांतरणसह सुविधांसाठी प्रयत्नशील
नगराध्यक्षा सोनल कोठडीया; निपाणी नगरपालिकेती बैठकीत निर्णय निपाणी (वार्ता) : निपाणी येथील डॉ. आंबेडकर विचार मंच व विविध संघटनेच्या वतीने सात वर्षांपूर्वी आंदोलन करून मिळवलेले वाचनालय केवळ तांत्रिक अडचणीमुळे आजतागायत रखडलेले होते. ते पूर्ण करून सुसज्ज ग्रंथालय निर्माण करू असे आश्वासन नगराध्यक्षक्षा सोनल कोठाडीया यांनी दिले. येथील नगरपालिकेमधील दिवंगत …
Read More »जातीय जनगणनेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
राज्य सरकारला मोठा दिलासा; डेटा उघड न करण्याची अट बंगळूर : कर्नाटक राज्य मागासवर्ग आयोगाकडून करण्यात येत असलेल्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाला (जातीय जनगणना) स्थगिती देण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. २५) नकार दिला. हा राज्य सरकारसाठी मोठा दिलासा आहे. जातीय जनगणनेला स्थगिती देण्याच्या याचिकांवर सुनावणी करणाऱ्या मुख्य न्यायाधीश …
Read More »सर्वेक्षणावेळी “धर्म -हिंदू, जात -मराठा, उपजात -कुणबी आणि मातृभाषा -मराठी” नमूद करण्याचे समितीच्या बैठकीत आवाहन
बेळगाव : कर्नाटक सरकारने हाती घेतलेल्या सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षणावेळी खानापूर तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी धर्म -हिंदू, जात -मराठा, उपजात -कुणबी आणि मातृभाषा -मराठी असे नमूद करण्याचे आवाहन खानापूरचे माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी केले आहे. जातीनिहाय जनगणने संदर्भात आज गुरुवारी पार पडलेल्या खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीमध्ये …
Read More »पद्मभूषण पुरस्कार विजेते, ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा यांचे निधन
बंगळूर : कन्नड सारस्वताच्या जगतात सरस्वती पुत्र म्हणून ओळखले जाणारे आणि प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार विजेते डॉ. एस. एल. भैरप्पा (वय ९४) यांचे आज निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते वयोमानाशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते. बंगळूर शहरातील राजराजेश्वरी नगर येथील राष्ट्रोत्थान रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचाराला यश न आल्याने …
Read More »खानापूर तालुक्यात प्री-पेड मीटर योजनेची सुरुवात; तालुक्यातील पहिले प्री-पेड मीटर नवरात्र उत्सव मंडळाला
खानापूर : खानापूर हेस्कॉम उपविभागात आजपासून प्री-पेड मीटर योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातील पहिले प्री-पेड मीटर अर्बन बँक चौक येथे नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या श्री दुर्गादेवी नवरात्र उत्सव मंडळाला तात्पुरत्या वीज जोडणीसाठी बसविण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश वीजपुरवठा पारदर्शक आणि अखंडित ठेवण्याचा असून, मोबाईलप्रमाणे रिचार्ज पद्धतीने वीज वापरण्याची ही नवी …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक गुरुवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलावण्यात आलेली आहे. तरी म. ए. समितीचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांनी वेळेत हजर रहावे, असे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, माजी आमदार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta