Monday , June 29 2026
Breaking News

मंत्री डी. सुधाकर यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय क्षेत्राची हानी

Spread the love

 

सहकार रत्न उत्तम पाटील; दक्षिण भारत जैन सभेतर्फे आदरांजली

निपाणी (वार्ता) : कर्नाटकचे नियोजन व सांख्यिकी मंत्री. डी. सुधाकर यांना दक्षिण भारत जैनसभा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तर्फे येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सहकाररत्न उत्तम पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी नगरसेवक रवींद्र शिंदे यांच्या हस्ते आदरांजली पाहण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुधाकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
उत्तम पाटील म्हणाले, डी. सुधाकर हे केवळ मंत्री नव्हते, तर जनसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे एक संवेदनशील आणि आपुलकीचे नेतृत्व होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रामाणिकपणे कार्य केले. कार्यकर्त्यांवरील त्यांचा विश्वास, सर्वसामान्याप्रती असलेली आत्मीयता आणि विकासासाठीची त्यांची धडपड सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने केवळ कर्नाटक राज्याचेच नव्हे, तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. प्रत्येक व्यक्तीशी जिव्हाळ्याचे नाते जोडणारा लोकनेता आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याचे सांगितले. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्यासह मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य, माजी नगरसेवक रवींद्र शिंदे, गोपाळ नाईक, गाव कामगार पाटील राजू पाटील, आर. बी. खोत, सुंदर पाटील, दिलीप पठाडे, बाळासाहेब सुर्यवंशी, संजय पावले, राजेंद्र कंगळे, प्रशांत नाईक, सुनील बल्लोळ, रावसाहेब गोरवाडे, प्रदीप पाटील, सूरज राठोड, विष्णू कडाकणे, अमित शिंदे, इम्रान मकानदार, महेश पाटील, शशीकुमार गोरवाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘या हुसेन, या हुसेन’च्या जयघोषात निपाणी परिसरात मोहरम सण साजरा

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मोहरम सण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *