Tuesday , September 1 2026
Breaking News

मराठी भाषा प्रेरणा मंचच्यावतीने दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सन्मान

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील मराठी भाषा प्रेरणा मंचच्यावतीने नुकताच निकाल जाहिर झालेल्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांची यादी शिक्षण खात्याकडून घेण्यात येणार असून, यामध्ये बेळगाव शहरातील गुणानुक्रमे पाहिले दहा विद्यार्थी, बेळगाव ग्रामीण भागातील गुणानुक्रमे पाहिले दहा विद्यार्थी आणि खानापूर तालुक्यातील गुणानुक्रमे पाहिले दहा विद्यार्थी, असे एकूण तीस घेऊन त्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.
याशिवाय ज्या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे, अशा शाळांच्या मुख्याध्यापकांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे. ज्या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्या मुख्याध्यापकांनी स्व प्रमाणित केलेले अर्ज आम्ही दिलेल्या व्हाटस्अप नंबर 9619588606 या नंबर वर पाठवून द्यावेत, असे आवाहन मराठी भाषा प्रेरणा मंचच्या वतीने करण्यात आले आहे .अधिक माहितीसाठी मराठी भाषा प्रेरणा मंचचे अध्यक्ष प्रा.डॉ. गोपाळराव पाटील भ्रमण ध्वनी क्रमांक 9619588606 यांच्याशी संपर्क साधावे असे कळविण्यात आले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांची यादी तयार होताच तारीख व ठिकाण सांगण्यात येईल. असे कळविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

वडगाव जनावरांचा दवाखाना स्टाफअभावी बंद; शेतकऱ्यांची गैरसोय

Spread the love  वडगाव : जुने बेळगाव व वडगाव परिसरातील हजारो जनावरांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *