Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

वेग, चपळता आणि जिद्दीचा संगम म्हणजे म. मं. ताराराणी पदवी पूर्व काॅलेजच्या खो -खो खेळाडूंचा आक्रमक उगम!

  खानापूर : गर्लगुंजी येथे एकलव्य क्रीडा अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या भव्य खो-खो स्पर्धेत म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर येथील खेळाडूंनी आपल्या वेगवान चाली, अचूक टच, धारदार चेसिंग आणि भक्कम बचावाच्या जोरावर बेळगाव जिल्ह्यातील मातब्बर संघांना अक्षरशः घाम फोडत उपविजेतेपदावर आपले नाव कोरले. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात …

Read More »

दोनच दिवसात अलंग, मदन कुलंगा किल्ला सर

  बेनाडी ‘सह्याद्री ट्रेकर्स’च्या; आजपर्यंत ६८ किल्ल्यांची भ्रमंती निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील सह्याद्री ट्रेकर्सच्या ग्रामपंचायत सदस्य शहाजी पाटील व लखन माळी यांच्यासह सदस्यांनी महाराष्ट्रातील नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर ४ हजार ८०० फुटावर असलेल्या अलंग, मदन, कुलंग (एएमके) हे तीन किल्ले केवळ दोन दिवसात सर करण्याचा उपक्रम राबविला. हे …

Read More »

खडतर मेहनतीला मिळाले आकाशाचे (यशाचे) पंख; म. मं. ताराराणी काॅलेजची कु. ऋतुजा पागाद वायुसेना दलात दाखल!

  खानापूर : कठोर मेहनत आणि देशसेवेची जिद्द यांच्या जोरावर ताराराणी काॅलेजची कु ऋतुजा पागाद हिने भारतीय वायुसेनेत आपला दमदार प्रवेश केला आहे. कुमारी ऋतुजाच्या या यशामुळे मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव उंचावला असून काॅलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींसाठी ती दीपस्तंभ बनली आहे . आजवर …

Read More »

सत्तावाटपाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवकुमारांची दिल्लीत वरिष्ठांशी चर्चा

  राजकीय वर्तुळात औत्सुक्य बंगळूर : राज्य काँग्रेसमध्ये सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून गटबाजी तीव्र होत असताना उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दिल्लीतील कथित ‘मतचोरी’विरोधातील निषेध आंदोलनात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्यासह अनेक मंत्री व आमदार सहभागी झाले होते. आंदोलनानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Read More »

दिल्लीतील दाट धूर-धुक्याचा फटका; कर्नाटकातील २१ आमदार अडकले चार तास विमानात

  बंगळूर : दिल्लीतील दाट धूर व धुक्यामुळे कर्नाटकातील २१ आमदारांना घेऊन जाणारे इंडिगोचे विमान तब्बल चार तासांहून अधिक काळ उशिराने उड्डाण करू शकले. त्यामुळे आज पहाटे आमदारांना विमानातच अडकून राहावे लागले. शहरात आयोजित ‘मत चोरी’ विषयावरील परिषदेसाठी मंत्री व काँग्रेस आमदार दिल्लीला आले होते. त्यानंतर दावणगेरे येथे होणाऱ्या ज्येष्ठ …

Read More »

भोवी-वडर समाजाच्या विकासासाठी ६०० कोटीचा निधी मंजूर

  मंत्री शिवराज तंगडगी यांची माहिती : बेळगावमध्ये समाजाची चिंतन बैठक निपाणी (वार्ता) : भोवी वडर समाजाच्या विकासासाठी कर्नाटक राज्य सरकार कटिबद्ध असून या समाजासाठी भरीव असा ६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामधून अनेक सोयी-सुविधा व योजना लागू होणार आहेत. त्याचा लाभ समाज बांधवांनी -घेऊन आपल्यासह समाजाचा विकास …

Read More »

कणकुंबी ग्राम पंचायत पी.डी.ओं.ना न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस

  खानापूर : कणकुंबी ग्राम पंचायत हद्दीतील ग्राम पंचायत मिळकत नं. 704 ही मिळकत पुर्वजात दिपक गुंडू वाडेकर व त्यांच्या इतर कुंटुंबीयांना यांच्या पुर्वजात मालकी कब्जात असून हि मिळकत पुर्वीपासून गुंडू वाडेकर यांच्या नांवे ग्राम पंचायत दप्तर मध्ये नोंदणी आहे. सदर मिळकतीबाबत पंचायत टॅक्स वगैरे मयत गुंडू चिमणा वाडेकर व …

Read More »

निपाणीत ७ जानेवारीपासून ‘मालक चषक’ क्रिकेट स्पर्धा

  अडीच लाखांची बक्षिसे : उद्योजक रोहन साळवे यांची माहिती निपाणी (वार्ता) : स्थानिक क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे. दिवस रात्र प्रकाश झोतातील क्रिकेटचा अनुभव मिळून तरुण खेळाडूंना मैदान उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘मालक चषक’ प्रभागनुसार डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ७ ते ११ जानेवारीपर्यंत या …

Read More »

अंड्यांमध्ये कर्करोगजन्य पदार्थ आढळल्याची चर्चा; आरोग्य विभाग सतर्क, अंडी चाचणीचे आदेश

  बंगळूर : अंडी प्रेमींसाठी एक आवर्जून पहावी अशी कहाणी. अंडी कर्करोगजनक असल्याच्या अफवेबद्दल लोकांच्या चिंता दूर करण्यासाठी आरोग्य विभाग पुढे आला आहे. आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व ब्रँडच्या अंड्यांची चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, अन्न सुरक्षा विभागाकडून सहा महिन्यांपूर्वी केलेल्या चाचणीत अंडी सुरक्षित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सर्व ब्रँडच्या …

Read More »

ज्येष्ठ काँग्रेस आमदार शमनूर शिवशंकरप्पा यांचे निधन

  बेळगाव : ज्येष्ठ काँग्रेस आमदार आणि अखिल भारतीय वीरशैव महासभेचे अध्यक्ष शमनूर शिवशंकरप्पा यांचे निधन झाले आहे. ते ९४ वर्षांचे होते. वृद्धापकाळामुळे काही आजारांनी ग्रस्त असलेले शमनूर शिवशंकरप्पा यांना उपचारासाठी बेंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारांचा उपयोग झाला नाही. आज संध्याकाळी ६:४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास …

Read More »