Sunday , August 23 2026
Breaking News

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये ‘डॉक्टर्स डे’ दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्राबाबत मार्गदर्शन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘डॉक्टर्स डे’ साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका स्नेहा घाटगे तर प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेची माजी विद्यार्थिनी डॉ.अल्फिया उस्ताद नदाफ उपस्थित होत्या.
समर्थ आयरेकर याने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्याध्यापिका स्नेहा घाटगे यांच्या हस्ते डॉ. नदाफ यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. अल्फिया नदाफ यांनी वैद्यकीय क्षेत्रातील संधी व त्याची तयारी कशी करावी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याशिवाय आपल्या यशामध्ये या शाळेतील शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. स्नेहा घाटगे यांनी डॉक्टरांची समाजातील भूमिका आणि आव्हाने याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. सानवी जोंधळे, प्रतिमा चव्हाण व तेजस्विनी शेंद्रे यांनी डॉक्टरांचे समर्पण आणि सेवेबद्दल मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. फलक पटेल व आर्या पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विराज चव्हाण यांने आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे देवचंद कॉलेज परिसरात बाकडी

Spread the love  निपाणी (वार्ता) : सामाजिक बांधिलकीची विचारधारा जपत जेष्ठ नागरिक सेवा संघा तर्फे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *